आजचे राशीभविष्य - 17  जून 2021 - कन्येसाठी चिंतेचा अन् मीनसाठी आनंदाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 07:30 AM2021-06-17T07:30:23+5:302021-06-17T07:30:56+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's Horoscope - June 17, 2021 | आजचे राशीभविष्य - 17  जून 2021 - कन्येसाठी चिंतेचा अन् मीनसाठी आनंदाचा दिवस

आजचे राशीभविष्य - 17  जून 2021 - कन्येसाठी चिंतेचा अन् मीनसाठी आनंदाचा दिवस

Next

मेष
आजचा दिवस मध्यम फलदायी असेल. स्वास्थ्य जेमतेम राहील. शारीरिक थकवा जाणवेल. शक्यतो प्रवास टाळावा. हट्टीपणा सोडून द्या. तब्बेत सांभाळा कारण पोटाच्या तक्रारी उदभवतील.  आणखी वाचा

वृषभ
आजचा आपला दिवस मध्यम फलदायी राहील. पैतृक संपत्ती पासून लाभ होण्याचे योग आहेत. वडील आपणांशी खूप चांगल्या रीतीने वागतील. खेळाडू आणि कलाकारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आणखी वाचा

मिथुन
आजचा दिवस चांगला आणि आनंददायी जाईल. भावंडे, मित्र, शेजारी यांच्याशी संबंध चांगले राहतील. आर्थिक दृष्ट्या सावध राहा. श्रीगणेश गुंतवणूकदारांना इशारा देतात की सावधपणे पैसे गुंतवा. मन चंचल राहील. आणखी वाचा

कर्क
आज मध्यमफलदायी दिवस राहील. मनात मरगळ राहील. केलेल्या कामाचे समाधान वाटणार नाही. तब्बेत ठीक राहणार नाही. उजव्या डोळ्याला त्रास होण्याची शक्यता. कुटुंबात मतभेद होतील. आणखी वाचा

सिंह
आजचा दिवस शुभ फलदायी जाईल. आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक काम दृढ विश्वासाने पूर्ण करू शकाल. सरकारी कामात यश मिळेल. वडील आणि वडीलधार्यांचे सहकार्य लाभेल.  आणखी वाचा

कन्या
दिवसभर शारीरिक आणि मानसिक चिंतेच्या दबावाखाली राहाल. आज कोणाशीही अहंपणामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्या. कोर्ट-कचेरी संबंधी सावध राहा. अचानक खर्च उद्भवतील. आणखी वाचा

तूळ
आजचा दिवस शुभफलदायी आहे. विविध स्तरांवर लाभ होण्याचे योग आहेत. मित्रांच्या भेटी होतील आणि रम्यस्थळी सहलीला जाण्याची शक्यता आहे. घरात पत्नी व पुत्र यांच्याकडून सुख मिळेल. आणखी वाचा

वृश्चिक
आजचा दिवस शुभफलदायी आहे. गृहस्थजीवनात आनंद व उल्हास राहील. विनाविलंब सर्व कामे पूर्ण होतील. मान-सम्मान मिळेल. नोकरी- व्यवसायात पदोन्नती मिळेल. उच्चाधिकारी व जुन्या जाणत्या लोकांची कृपादृष्टी राहील. आणखी वाचा

धनु
आपणांस यात्रा- प्रवास स्थगित करण्याची सूचना देत आहेत. शरीरात थकवा जाणवेल. तब्बेतही यथातथाच राहील. मनात चिंता व व्याकुळता राहील. संतती विषयी काळजी वाटेल.  आणखी वाचा

मकर
ऑफिस तथा व्यवसाय क्षेत्रात आज परिस्थिती अनुकूल राहील. ऑफिसमधील कार्य कुशलतेने कराल. व्यावहारिक व सामाजिक कामानिमित्त बाहेर जाण्याची संधी मिळेल. खाणे- पिणे, हिंडणे- फिरणे याकडे लक्ष राहील. आणखी वाचा

कुंभ
आज आपणात खंबीर मनोबल आणि आत्मविश्वास दिसून येईल. प्रणय प्रसंग दिवस आनंदी बनवतील. भिन्न व्यक्तींशी परिचय होतील आणि मैत्री वाढेल. जवळचा प्रवास किंवा आनंददायी पर्यटन कराल.   आणखी वाचा

मीन
आजचा दिवस शुभ फलदायी राहील. दृढ मनोधैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. आरोग्य खूप चांगले राहील. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण असेल. दैनिक कामे सुरक्षित पार पडतील.   आणखी वाच

Web Title: Today's Horoscope - June 17, 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.