आजचे राशीभविष्य - 21 जून 2020; लक्ष्मीची कृपा राहिल, आजचा दिवस लाभदायक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 07:22 AM2020-06-21T07:22:34+5:302020-06-21T07:23:49+5:30

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

Today's horoscope - June 21, 2020; Lakshmi's grace will remain, today is a beneficial day | आजचे राशीभविष्य - 21 जून 2020; लक्ष्मीची कृपा राहिल, आजचा दिवस लाभदायक

आजचे राशीभविष्य - 21 जून 2020; लक्ष्मीची कृपा राहिल, आजचा दिवस लाभदायक

Next

मेष - आजचा दिवस शुभ फलदायक आहे. विचार एकदम बदलतील त्यामुळे महत्त्वपूर्ण कार्यात अंतिम निर्णय घेणे जमणार नाही. आणखी वाचा.

वृषभ - आज मन स्थिर ठेवण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. कारण चंचल मनोदशेमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल. समझोता करण्याची दृष्टी ठेवलीत तर कोणाशी संघर्ष होणार नाही. आणखी वाचा.

मिथुन - लक्ष्मीची कृपा असल्यामुळे आजचा दिवस आर्थिक दृष्टीकोनातून लाभदायक ठरेल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा.

कर्क - आर्थिक नियोजन आणि नव कार्यारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. उद्योग- धंद्यात लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नाच्या मार्गांत वाढ झाल्याने आपणाला खूप आनंद आणि समाधान वाटेल. आणखी वाचा.

सिंह - श्रीगणेश आजचा दिवस आपणाला लाभदायी आहे असे सांगतात. स्त्रिया व मित्रवर्गाकडून लाभाची शक्यता. रम्य स्थळी प्रवासाला जाल. आणखी वाचा.

कन्या - शुभ फल प्राप्तीचा दिवस. नव्या कार्याचे बेत तडीस जातील. व्यापारी आणि नोकरदारांसाठी दिवस फारच चांगला आहे. आणखी वाचा.

तूळ - व्यावसायिक क्षेत्रात लाभांचे संभव श्रीगणेश वर्तवितात. नोकरी आणि व्यापारात सहकारी सहकार्य करणार नाहीत. आणखी वाचा.

वृश्चिक - आजचा दिवस शांततेत व सावधानतेत घालवा असा श्रीगणेशांचा तुम्हाला सल्ला आहे. नवीन कामात अपयश येण्याचे योग असल्याने नवीन कामे सुरू करू नका. आणखी वाचा.

धनु - श्रीगणेश म्हणात की आपला आजचा दिवस आनंदात जाईल. मनोरंजनाच्या प्रसंगातून मन आनंदी राहील. विरुद्ध लिंगी व्यक्तीच्या सहवासातून आनंद मिळेल. आणखी वाचा.

मकर - व्यापारातील प्रगतीसाठी आजचा दिवस लाभप्रद आहे असे श्रीगणेशांचे म्हणणे आहे. व्यवसायात तुम्ही ठरविल्याप्रमाणे काम करु शकाल. आणखी वाचा.

कुंभ - आपले विचार व बोलणे यात बदलाव येईल. बौद्धिक चर्चेत भाग घ्याल. ध्यान, लेखन व सृजनात्मकता यातून आनंद मिळेल. आणखी वाचा.

मीन -श्रीगणेश म्हणतात की आज आपल्यात स्फूर्ती आणि उत्साह कमी असेल. कुटुंबियांशी वादविवाद न करण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. आणखी वाचा.

Web Title: Today's horoscope - June 21, 2020; Lakshmi's grace will remain, today is a beneficial day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.