आजचे राशीभविष्य - 21 जून 2021 - मेषसाठी धनलाभाचे योग, वृश्चिक चिंतेचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 07:29 AM2021-06-21T07:29:37+5:302021-06-21T07:30:18+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
आज सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल. धनलाभाचे योग आहेत. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवाल. बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल. आणखी वाचा
वृषभ
मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपले काम निर्धारित वेळेत नियोजनानुसार पूर्ण होईल. आर्थिक लाभ संभवतात. अपूर्ण कामे पूर्ण होतील. माहेरहून आनंदाच्या बातम्या येतील. आणखी वाचा
मिथुन
जीवनसाथी आणि संतती यांच्या आरोग्याविषयी विशेष लक्ष पुरविण्याची पूर्वसूचना श्रीगणेश देत आहेत. वाद-विवाद आणि बौद्धिक चर्चेपासून दूर राहा. अपमान होणार नाही याची काळजी घ्या. आणखी वाचा
कर्क
प्रफुल्लता, स्फूर्ती आणि आनंद यांचा अभाव राहील. कुटुंबीयांशी तक्रारी वाढतील. पैसा खर्च होईल आणि कामात अपयश येईल. वेळेवर भोजन मिळणार नाही. आणखी वाचा
सिंह
आजचा दिवस सुखासमाधानात जाईल. भावंडाबरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. त्यांचे सहकार्य पण आपणास मिळेल. संबंधांमधील भावनांची जाणीव आपणाला होईल. एखाद्या रम्य पर्यटनस्थळी सहलीला जाण्याचे ठरवाल. आणखी वाचा
कन्या
गोड बोलण्याने आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. तब्बेत चांगली राहील. कोणाशी बौद्धिक चर्चा करू नका. गोडधोड जेवणाचा आस्वाद घ्याल. आणखी वाचा
तूळ
आज आपण आर्थिक नियोजन व्यवस्थित कराल. सृजनशीलता वाढेल. शारीरिक आणि मानसिकदृष्टया स्वास्थ्य लाभेल. दृढ विचारांमुळे हाती घेतलेले काम पूर्ण कराल. आत्मविश्वास वाढेल. आणखी वाचा
वृश्चिक
शारीरिक शैथिल्य आणि मानसिक चिंता यांमुळे मन ग्रासून जाईल. वाहन चालवताना अपघात होणार नाही याची काळजी घ्या. शक्य असेल तर आज शस्त्रक्रिया करू नका. आणखी वाचा
धनु
आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील. मित्र आणि परिवारासह पर्यटन स्थळी भटकण्याचा आनंद मिळेल. व्यापारात लाभदायी ठरणारा दिवस. आणखी वाचा
मकर
कुटुंब आणि संतती यांच्याविषयी आपणाला आनंद आणि समाधान वाटेल. स्नेही व मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. व्यापारात पैशाच्या वसुलीसाठी बाहेर जावे लागेल आणि ते फायदेशीर ठरेल. आणखी वाचा
कुंभ
शारीरिक अस्वास्थ्य राहील. शैथिल्य आणि आळस राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायात वरिष्ठांशी काम करताना सांभाळून राहा. आनंद- मौजमजा यासाठी पैसा खर्च होईल. आणखी वाचा
मीन
क्रोध आणि वाणीवर संयम ठेवा. आरोग्या विषयी दक्ष राहा. सरकार विरोधी कृत्यांपासून दूर राहा. तब्बेतीच्या देखभालीसाठी पैसा खर्च करावा लागेल. मानसिक बेचैनी जाणवेल. आणखी वाचा