आजचे राशीभविष्य - 22 जून 2021 - मेषसाठी सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान तर मकरसाठी व्यवसायिक क्षेत्रात मिळेल यश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 07:22 AM2021-06-22T07:22:05+5:302021-06-22T07:22:45+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope - June 22, 2021 | आजचे राशीभविष्य - 22 जून 2021 - मेषसाठी सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान तर मकरसाठी व्यवसायिक क्षेत्रात मिळेल यश

आजचे राशीभविष्य - 22 जून 2021 - मेषसाठी सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान तर मकरसाठी व्यवसायिक क्षेत्रात मिळेल यश

Next

मेष
नव्या वस्त्रांची आणि अलंकाराची खरेदी कराल. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल. पण दुपारनंतर मात्र हर प्रकारे आपणाला संयमाने व्यवहार करावा लागेल. आणखी वाचा

वृषभ
व्यावसायिकांना आजचा दिवस लाभदायक आहे. कुटुंबातील वातावरण सुख शांतिपूर्ण असेल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. व्यवसायाच्या ठिकाणी सहकारी आपणांस मदत करतील. आणखी वाचा

मिथुन
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नवे काम सुरू करू नका. बौद्धिक चर्चेसाठी दिवस चांगला नाही. संतती विषयक काळजी राहील. दुपारनंतर घरातील वातावरण सुख आणि शांती देणारे असेल. त्यामुळे माननसिक दृष्ट्या ताजेतवाने राहाल. आणखी वाचा

कर्क
आपली निराशा शारीरिक आणि मानसिक दृष्टया व्यस्त बनवेल. शक्यतो प्रवास टाळा. स्थावर संपत्तीचा व्यवहार स्थगित करणे आपल्या हिताचे ठरेल. आईची तब्बेत बिघडू शकते. आणखी वाचा

सिंह
नवीन कार्यारंभ कराल. परदेशातून लाभदायक वार्ता मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करणारांना काळ लाभदायक आहे. दुपारनंतर अधिक भावनाशील व्हाल. मनात निराशेची भावना वाढू शकेल. आणखी वाचा

कन्या
कोणत्याही प्रकारे निर्णयाप्रत पोहोचण्याची स्थिती नसल्याने नवीन कार्य हाती घेऊ नका. आज मौन पाळून दिवस घालवण्यात हुशारी आहे. अन्यथा कोणाशी मतभेद होऊ शकतात. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सामान्य राहील. आणखी वाचा

तूळ
आजच्या दिवसाचा प्रारंभ समतोल आणि दृढ वैचारिकतेने होईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. नवी वस्त्रे आणि अलंकार यावर जास्त खर्च होईल. दुपारनंतर मानसिकता अनिर्णित अवस्थेत बदलेल. आणखी वाचा

वृश्चिक
मनात येणार्‍या नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कोर्ट- कचेरीच्या कामात जपून राहा. शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता. दुपारनंतर कार्यपूर्ती दृष्टिक्षेपात येईल. आणखी वाचा

धनु
आजचा दिवस उत्पन्नात वाढ आणि लाभ देण्याची सूचना देणारा आहे. सामाजिक कार्यात भाग घेतल्याने मन प्रसन्न राहील. मान- सन्मान व उत्पन्नात वाढ होईल. व्यापारात लाभाची शक्यता. आणखी वाचा

मकर
स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी आजचा दिवस शुभ आहे. व्यवसायिक क्षेत्रात यश मिळेल. वरिष्ठ अधिकारी आपणाला प्रोत्साहन देतील. बढतीचे योग आहेत. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.  आणखी वाचा

कुंभ
आज व्यावसायिकांना जपून वागणे आवश्यक आहे. वरिष्ठांशी बोलताना विवेक राखा. संततीच्या आरोग्याची काळजी राहील. दीर्घकालीन प्रवासाची योजना आखाल. धार्मिक स्थळी यात्रा होण्याचे संकेत आहेत. आणखी वाचा

मीन
कोणाशी वादविवाद किंवा भांडण करू नका. क्रोधावर ताबा ठेवा. गूढ विद्येचे आकर्षण राहील. सुखमय बाबींत गोडी वाटेल. गहन चिंतन मनाला शांती देईल. दुपारनंतर अनुकूल काळ आहे. बौद्धिक दृष्ट्या लेखन कार्यात सक्रीय भाग घ्याल. आणखी वाच

Web Title: Today's horoscope - June 22, 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.