आजचे राशीभविष्य - 24 जून 2021 - कन्येसाठी लाभाचा अन् सिंहसाठी चिंतेचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 07:24 AM2021-06-24T07:24:06+5:302021-06-24T07:24:48+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
गूढ विद्या तसेच रहस्यमय विषय समजून घेण्याचा आज प्रयत्न करा. उक्ती आणि कृतीवर संयम ठेवा, तेच आपल्या फायदयाचे आहे. आणखी वाचा
वृषभ
दिवसाची सुरुवात आनंदाने व मित्रभेटीने होईल. नवीन माणसे भेटतील. सहलींचे आयोजन होऊ शकंते. भाषेचा दुरुपयोग करू नका नाहीतर वादविवाद होतील. आणखी वाचा
मिथुन
आजचा दिवस मनोरंजनातून आनंद घेण्याचा आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. कार्यालयात सहकार्याचे वातावरण असेल. आणखी वाचा
कर्क
प्रतिकूलतेतून कष्टाने काम कराल तर पुढे रहाल. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. परंतु दुपारनंतर परिस्थिती अनुकूल बनेल. स्वास्थ्य सुधारेल. मानसिक स्वास्थ्यही ठीक राहील. आणखी वाचा
सिंह
मानसिक स्थिती तणावपूर्ण राहील व शारीरिकदृष्टया अस्वस्थता जाणवेल. कुटुंबियांशी एखादा खटका उडू शकतो म्हणून संयम ठेवण्याचा सल्ला गणेशजी देतात. धन व कीर्ती यांची हानी संभवते मुलांबद्दल चिंतित रहाल. आणखी वाचा
कन्या
आपल्याला भाग्यवृद्धि आणि लाभाचा योग. आप्तांकडून फायदा. आपसातील संबंधात प्रेम आणि सन्मानाचे वातावरण असेल. परंतु दुपारनंतर चिंतीत रहाल त्याचा शरीर व मनाच्या स्वास्थ्य वर परिणाम होऊ शकतो. आणखी वाचा
तूळ
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. कौटुंबिक वादात बोलण्यावर संयम ठेवा. नकारात्मक मानसिकता सोडून द्या. घरच्या सदस्याना चिंता होणार नाही याकडे लक्ष द्या. दुपारनंतर मनातील खेद दूर होऊन आनंदाचा प्रकाश निर्माण होईल. आणखी वाचा
वृश्चिक
आजचा आपला मध्यम दिवस आहे. सुख व समाधान अनुभवाल. कुटुंबियासमवेत आनंदात वेळ घालवाल. शुभ समाचार येतील. दुपारनंतर कुटुंबात वाद होऊ शकतात म्हणून गैरसमज दूर करा. आणखी वाचा
धनु
आजचा दिवस दुर्घटना तसेच शल्यचिकित्सा यापासून सांभाळून रहा. आनंद व सुख यासाठी अधिक खर्च होईल. स्वभाव तापत बनेल. संबंधितांशी मनाविरुद्ध घटना घडतील. आणखी वाचा
मकर
आजचा दिवस व्यापार धंद्यासाठी लाभदायक आहे. पत्नी आणि पुत्र यांच्याकडून फायदा होईल. पारिवारिक जीवनात घडणारे सुखदायी प्रसंगामुळे मन आनन्दी राहील. दुपारनंतर मनाची अशान्ती व शारीरिक अस्वस्थता राहील. आणखी वाचा
कुंभ
व्यवसाय धंद्यात प्राप्ती होईल. मानसम्मान होईल. नोकरी व्यवसायात पदोन्नती. वरिष्ठ आपल्यावर प्रसन्न राहतील. स्वास्थ्य ठीक राहील. येणे वसूल होईल. मित्र भेटतील. रमणीय स्थळाला भेट द्याल. आणखी वाचा
मीन
बौद्धिक विषयात व त्या संबंधी लेखनात आज आपण मग्न रहाल. नवीन कार्याची सुरुवात करू शकता. दूरचे प्रवास व तीर्थयात्रा यांचे योग आहे, मोठया प्रतिष्ठानला भेट द्याल. परदेशातील मित्र स्वकियांशी सुसंवाद साधाल. आणखी वाचा