आजचे राशीभविष्य - 29 जून 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आज जीवनसाथी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 07:28 AM2020-06-29T07:28:42+5:302020-06-29T07:29:07+5:30

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

Today's horoscope - June 29, 2020; People of this zodiac sign will get a spouse today | आजचे राशीभविष्य - 29 जून 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आज जीवनसाथी मिळणार

आजचे राशीभविष्य - 29 जून 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आज जीवनसाथी मिळणार

Next

मेष - व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील आनंददायी वातावरण पण आपल्या मनाला प्रफुल्लित ठेवण्यात मदत करेल.  आणखी वाचा

वृषभ - आज बौद्धिक चर्चेपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. विद्यार्थ्यांसाठी खडतर काळ आहे. मनाला काळजी लागून राहील. आणखी वाचा

मिथुन - आज उत्साहाचा अभाव राहील. कुटुंबातील व्यक्तींशी वादावादी होण्याची शक्यता. स्थावर संपत्ती, संबंधित व्यक्तींपासून सावध राहा. आणखी वाचा

कर्क - अविचाराने कोणतेही कार्य न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आप्तस्वकीयांच्या भेटीने आनंद वाटेल. आणखी वाचा

सिंह - आज बौद्धिक क्षमतेत वाढ झाल्याने चर्चेत सहभागी होऊ शकता पण वादविवाद टाळा असे श्रीगणेश सुचवितात. आणखी वाचा

कन्या - आपल्या वाणीच्या प्रभावाने आज आपणाला लाभ होईल, असे श्रीगणेश सांगतात. इतर लोकांशी असणार्‍या संबंधात प्रेमवृद्धी होईल. आणखी वाचा

तूळ - संतापाला आवर घालून स्वभाव मृदू व कोमल ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. बोलण्यावर संयम ठेवल्यामुळे वातावरण शांत करण्यात सफल व्हाल. आणखी वाचा

वृश्चिक - जीवनसाथी गवसण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ असल्याचे श्रीगणेश सांगतात. उत्पन्न आणि व्यापारात वाढ होण्याचे योग आहेत. आणखी वाचा

धनु - श्रीगणेश कृपेने आज आपली कामाची योजना व्यवस्थित पूर्ण होईल. व्यवसायिक यश प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. आणखी वाचा

मकर - परदेशगमनाची अपेक्षा करणार्‍यांना यशाची शक्यता आहे, असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक यात्रेमुळे आज धर्मप्रवणतेचा अनुभव येईल. आणखी वाचा

कुंभ - नव्या कामाची सुरुवात आज करू नका असे श्रीगणेश सांगतात. आरोग्य संवर्धनाच्या हेतूने खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. आणखी वाचा

मीन - व्यापारात भागीदारीमध्ये आपणाला लाभ होईल. असे श्रीगणेश सांगतात. एखादया मनोरंजक स्थळी स्नेह्यांसोबत आनंदात वेळ घालवल्याने मन प्रफुल्लित होईल. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope - June 29, 2020; People of this zodiac sign will get a spouse today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.