आजचे राशीभविष्य - 30 जून 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आज अचानक धनाचा लाभ होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 07:13 AM2020-06-30T07:13:18+5:302020-06-30T07:13:51+5:30
जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस
मेष - आज श्रीगणेशाचा आशीर्वाद लाभल्याने दिवसभर मानसिक दृष्ट्या समाधान वाटेल. कौटुंबिक जीवन सुखी राहील. आणखी वाचा
वृषभ - आज दिवसभर मनात आनंदाची छटा उमटेल. कामात व्यवस्थितपणे आघाडीवर राहाल आणि योजनेनुसार कार्यपूर्ण करू शकाल. आणखी वाचा
मिथुन - आजचा दिवस मध्यम राहील. नवे काम हाती घेण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. पत्नी आणि संततीविषयी चिंता वाटेल. आणखी वाचा
कर्क - आज सांभाळून राहा. शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता राहण्यासाठी आज कष्ट घ्यावे लागतील. छातीत दुखणे किंवा अन्य विकारांमुळे त्रास जाणवेल. आणखी वाचा
सिंह - कामात यश आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात यांमुळे मनात प्रसन्नता दरवळेल. भावंडांशी भावदर्शी संबंध प्रस्थापित होतील. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस आपणासाठी शुभ राहील असे श्रीगणेश सांगतात. मधुर वाणी इतरांच्या मनावर सकारात्मक छाप पाडेल. आणखी वाचा
तूळ - आपल्या प्रत्येक कामात आत्मविश्वास झळकेल असा श्रीगणेशाच्या आशीर्वाद आहे. आर्थिक योजना व्यवस्थित करू शकाल. आणखी वाचा
वृश्चिक - श्रीगणेश म्हणतात की आज तुमचा हौसमौज व मनोरंजन यासाठी खर्च होईल. स्वास्थ्यासंबंधी तक्रार राहील. मनाला चिंता लागून राहील. आणखी वाचा
धनु - आर्थिक लाभ आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळतील तसेच कौटुंबिक जीवनात सुख संतोष अनुभवाल. श्रीगणेश कृपेने मिळकतीत वाढ आणि व्यापारात लाभ मिळेल. आणखी वाचा
मकर - व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा वाढतील. व्यापारासाठी धावपळ व वसुलीसाठी प्रवास यातून फायदा संभवतो. वरिष्ठ तुमच्यावर खूश असल्याने पदोन्नतीचे योग आहेत. आणखी वाचा
कुंभ - श्रीगणेश म्हणतात की शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ असलात तरीही मानसिक दृष्ट्या स्वस्थता टिकवण्याचा प्रयत्न करा. आणखी वाचा
मीन - श्रीगणेशांना आज तुमचा अचानक धन लाभाचा योग दिसतो आहे. मानसिक तसेच शारीरिक श्रमामुळे स्वास्थ्य खराब होऊ शकते. आणखी वाचा