आजचे राशीभविष्य - 7 जून 2020 कर्कसाठी आजचा दिवस आनंदाचा तर वृश्चिकसाठी मध्यम फलदायी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 07:00 AM2020-06-07T07:00:21+5:302020-06-07T07:00:52+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष - श्रीगणेश सांगतात की आज आपणाला थकवा, आळस आणि व्यग्रता जाणवेल. उत्साह वाटणार नाही. प्रत्येक गोष्टीत राग येईल. त्यामुळे कामात बिघाड होईल. आणखी वाचा
वृषभ - आज शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. नवीन कार्याचा आरंभ न करण्याचा सल्ला देतात. खाण्या- पिण्यावर विशेष लक्ष द्या. तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
मिथुन - श्रीगणेशांच्या मते आज आपण मनोरंजन आणि आनंदात मग्न राहाल. मित्र आणि कुटुंबीयांसमवेत आनंदी वातावरणात दिवस घालवाल. आणखी वाचा
कर्क - श्रीगणेशाच्या कृपेने आजचा दिवस आनंदाचा आणि यशदायक असेल. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात जाईल. महत्त्वाच्या कामावर खर्च होईल. आणखी वाचा
सिंह - आज आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील असे श्रीगणेश म्हणतात. सृजनशीलता विकसित होऊन नवनिर्मिती सुंदर प्रकारे करता येईल आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस आपणाला चांगला नाही असे श्रीगणेशांचे सांगणे आहे. अनेक गोष्टींची काळजी लागून राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आणखी वाचा
तूळ - आज भाग्योदय होईल असे श्रीगणेशांचे सांगणे आहे. भावा- बहिणींशी चांगले संबंध राहतील. धार्मिक यात्रेचे नियोजन कराल. नवीन कार्यारंभास शुभ दिवस आहे. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. वाणीवर ताबा ठेवा. त्यामुळे कुटुंबात सुख- शांति राहील. विचारांवर नकारात्मक पगडा पडेल. आणखी वाचा
धनु - निर्धारित केलेली सर्व कार्ये पूर्ण होतील असे श्रीगणेश सांगतात. लक्ष्मीची कृपा राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आपणाला आनंदी ठेवेल. आणखी वाचा
मकर - आज मन अस्वस्थ राहील असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी खर्च होईल. स्वकीय आणि मित्रांबरोबर पटणार नाही. धनहानी आणि मानहानीची शक्यता आहे. आणखी वाचा
कुंभ - आज आपणांस मिळणार्या फायदयामुळे आपला आनंद द्विगुणित होईल असे श्रीगणेश सांगतात. नव्या कार्यासाठी केलेला प्रारंभ कार्यसिद्धीच्या दृष्टीने शुभ आहे. आणखी वाचा
मीन - श्रीगणेश आजचा दिवस आपणाला शुभ फलदायी सांगतात. नोकरी व्यवसायात यश मिळेल. वरिष्ठ अधिकारी आपणावर खुश राहतील. त्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल. आणखी वाचा