आजचे राशीभविष्य - 15 मार्च 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 07:09 AM2020-03-15T07:09:50+5:302020-03-15T07:10:14+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष -
श्रीगणेश म्हणतात की आज आपणाला आध्यात्मिक दृष्टीने एक वेगळा अनुभव देणारा दिवस आहे. गूढ आणि रहस्यमय विद्या आणि त्यांसंबंधी गोष्टी यांचे आकर्षण राहील. आणखी वाचा
वृषभ -
श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आज आपल्या कौटुंबिक जीवनात सुखांचा अनुभव घ्याल. घरातील सदस्य आणि निकटवर्गीयांबरोबर प्रसन्न वातावरणात भोजनाचा आनंद घेऊ शकाल. आणखी वाचा
मिथुन -
आजचा दिवस आपणाला शुभ फलदायी जाईल असे श्रीगणेशांना सूचित करायचे आहे. घरात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा
कर्क -
आपण शांततेत आजचा दिवस घालवा असा सल्ला श्रीगणेश देतात. शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडेल. पोटदुखीचा विकार बळावेल. आणखी वाचा
सिंह -
श्रीगणेश सांगतात की आज आपण शारीरिक दृष्टया अस्वस्थ आणि मानसिक दृष्टया दुःखी राहाल. घरातील व्यक्तींबरोबर मतभेद होतील. आणखी वाचा
कन्या -
कोणत्याही कामात विचारपूर्वक पाऊल टाकण्याची सूचना श्रीगणेश देतात. भाऊ बहिणींशी प्रेमाचे संबंध बनून राहील. आणखी वाचा
तूळ -
श्रीगणेश सांगतात की आज आपले मनोबल कमी राहील. त्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे अवघड होईल. नवीन काम किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय आज घेऊ नका. आणखी वाचा
वृश्चिक -
आजचा दिवस आपणासाठी शुभ आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. घरातील व्यक्तींसमवेत दिवस आनंदात घालवाल. आणखी वाचा
धनु -
श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस आपणासाठी समस्यापूर्ण राहील. कुटुंबीयांशी चर्चा होईल व दुःखी व्हाल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा
मकर -
मित्र आणि संबंधितांशी भेट झाल्याने दिवस आनंदात जाईल. सामाजिक क्षेत्र, व्यापार व इतर क्षेत्रातही आजचा दिवस आपणाला लाभदायक आहे. आणखी वाचा
कुंभ -
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. आज प्रत्येक कामात सहज यश मिळेल. मनःस्थिती आनंदी राहील. आणखी वाचा
मीन -
श्रीगणेश सांगतात की मनाचे अस्वास्थ्य तुम्हाला ग्रस्त ठेवेल. शरीरात थकवा व आळस जाणवेल. वरिष्ठांशी व्यवहार जपून करा. संततीची काळजी राहील. आणखी वाचा