आजचे राशीभविष्य - 20 मार्च 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 07:09 AM2020-03-20T07:09:13+5:302020-03-20T07:09:37+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपल्याला मिश्र फल देणारा असेल. कुटुंबियांबरोबर बसून महत्त्वपूर्ण चर्चा कराल. घराच्या सजावटीत बदल करण्याचा विचार मनात येईल. आणखी वाचा.
वृषभ - श्रीगणेशजी सांगतात की नवीन कामांची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही त्यांची सुरुवातही करु शकाल. एखादया धार्मिक स्थळाला भेट देऊन तुमची वृत्तीही धार्मिक बनेल. आणखी वाचा.
मिथुन -आजचा दिवस प्रतिकूल आहे म्हणून आपण प्रत्येक दृष्टीने सावध राहा असे श्रीगणेशजी सांगतात. आज नवीन कामाची सुरुवात करू नका. क्रोधामुळे काही अनिष्ट होणार नाही याच्याकडे लक्ष द्या. आणखी वाचा.
कर्क - श्रीगणेश सांगतात की आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह आणि मनोरंजनात जाईल. भिन्न लिंगीय व्यक्ती भेटतील. आनंदाची साधने, वस्त्रे इ. खरेदी होईल. आणखी वाचा.
सिंह - संमिश्र फलदायी दिवसाचे भाकित श्रीगणेश सांगतात. घरात शांतता नांदेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्यांचे सहकार्य कमी मिळेल. दैनिक कामात अडथळे येतील. आणखी वाचा.
कन्या - श्रीगणेश सांगतात की संततीमुळे चिंता राहील. मन विचलीत राहील. पोटाच्या तक्रारीमुळे यातना होतील. विद्यार्जनात अडथळे येतील. अचानक खर्च उद्भवतील. आणखी वाचा.
तूळ -आज मानसिक थकवा जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. जास्त हळवे बनाल. मनात उठणार्या विचारतरंगांमुळे त्रास होईल. आई आणि स्त्री विषयक चिंता सतावेल. आणखी वाचा.
वृश्चिक - श्रीगणेश वर्तवितात की आज दिवसभर आपण आनंदी राहाल. नवीन कार्याचा आरंभ कराल. सहकार्यांकडून सुख व आनंद मिळेल. मित्र व नातलगांची भेट होईल. आणखी वाचा.
धनु - मध्यम फलदायी दिवसाची शक्यता श्रीगणेश सांगतात. नाहक खर्च होईल. मनात मरगळ असेल. कुटुंबीयांशी गैरसमज वाढतील त्यामुळे मनस्ताप होईल. कामात अपेक्षित यश मिळणार नाही. आणखी वाचा.
मकर - श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. नोकरी- व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. गृहस्थी जीवनात आनंदी वातावरण राहील. आणखी वाचा.
कुंभ - आरोग्याविषयी जागरूक राहणे आवश्यक आहे, असा सल्ला श्रीगणेश देतात. मानसिक स्वास्थ्य राहणार नाही. कोर्ट- कचेरीतील कटकटीमध्ये पडू नका. आणखी वाचा.
मीन - श्रीगणेशांच्या मते आज आपण कौटुंबिक आणि सामाजिक गोष्टींत भाग घ्याल. मित्रांच्या भेटी होतील. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. एखाद्या रम्य स्थळी सहलीसाठी जाऊ शकाल. आणखी वाचा.