आजचे राशीभविष्य - 12 नोव्हेंबर 2020; 'या' राशीच्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 10:30 PM2020-11-12T22:30:00+5:302020-11-12T22:30:03+5:30
Todays Horoscope 12 November 2020 : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष - आजचा दिवस आनंददायक राहील असे श्रीगणेश सांगतात. लक्ष्मी प्रसन्न झाल्यास आर्थिक योजना पूर्ण होतील. व्यावसायिक क्षेत्रात कार्य घडेल. जनसंपर्क वाढेल. आणखी वाचा.
वृषभ - वैचारिक पातळीवर थोरपणा आणि गोड वाणी यांमुळे इतरांवर प्रभाव पडेल. तसेच त्यांच्याशी संबंधामध्ये सुसंवाद निर्माण होतील. बैठका, चर्चा यातही आपणाला यश मिळेल. आणखी वाचा.
मिथुन - आज मनाची स्थिती दोलायमान राहील असे श्रीगणेश सांगतात. मन द्विधा बनेल. जादा हळवेपणा मनाला बेचैन करेल. आईविषयी अधिक भावनाशील राहाल. आणखी वाचा.
कर्क - भावांकडून आज लाभ होईल असे श्रीगणेशांचे सांगणे आहे. मित्रांची भेट आणि स्वकीयांचा सहवास याचा आनंद लाभेल. रम्य स्थळी प्रवासाला जाण्याची शक्यता. आणखी वाचा.
सिंह - विविध योजनांच्या विषयांवर अधिक विचार केल्यामुळे द्विधा अवस्था होईल. तरीही कुटुंबीयांसमवेत चांगले वातावरण राहील्याने आपली प्रसन्नता वाढेल. आणखी वाचा.
कन्या - आजचा दिवस फारच आनंदात जाईल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्साही आणि प्रसन्न राहाल. लक्ष्मीची कृपादृष्टी राहील. आणखी वाचा.
तूळ - रागावर नियंत्रण ठेवा, शक्यतो भांडण तंट्यापासून दूर राहा. कुटुंबीयांसमवेत एखाद्या गोष्टीवर वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्यात बिघाड होऊ शकते, विशेषत: डोळ्यांना सांभाळा. कोर्टाच्या कार्यात लक्ष ठेवा. आपला अपमान होणार नाही, याची काळजी घ्या. अध्यात्मिकता आणि ईश्वरभक्ती मनाला शांती देईल..
वृश्चिक - आजचा दिवस आप.णाला लाभदायक आणि शुभफल प्राप्तीचा ठरेल. सांसारिक सुख मिळेल. विवाहोत्सुकांना विवाहयोग आहेत. आणखी वाचा.
धनु - आजचा दिवस आपणाला शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. योग्य प्रकारे आर्थिक नियोजन कराल. इतरांच्या सहकार्यासाठी प्रयत्न कराल. प्रत्येक कामात यश मिळेल. आणखी वाचा.
मकर - श्रीगणेश आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी दर्शवितात. बौद्धिक कार्यासाठी मात्र दिवस शुभ आहे. लेखन अथवा साहित्यविषयक कार्य व्यवस्थित पार पडेल. आणखी वाचा.
कुंभ - निषेधात्मक आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. विचार आपणाला त्रास देतील. त्यामुळे मानसिक थकवा जाणवेल. आणखी वाचा.
मीन - आज मन चिंतामुक्त राहील. शंकाकुशंकामुळे प्रसन्नता जाणवणार नाही. कार्यांत विघ्ने आल्याने कार्य पूर्ण होण्यास वेळ लागेल. सहकार्यांकडून सहकार्य मिळणार नाही. आणखी वाचा.