आजचे राशीभविष्य - 16 नोव्हेंबर 2020, नव्या वस्त्रांची अन् अलंकारांची खरेदी कराल
By महेश गलांडे | Published: November 16, 2020 10:30 PM2020-11-16T22:30:00+5:302020-11-16T22:30:03+5:30
Todays Horoscope 16 november 2020 : कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष - आज संपूर्ण दिवस आप्तेष्टांसमवेत हर्षोल्हासात घालवाल असे श्रीगणेश सांगतात. नव्या वस्त्रांची आणि अलंकाराची खरेदी कराल. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल. आणखी वाचा
वृषभ - श्रीगणेश कृपेने आपल्या जीवनसाथीच्या जवळीकीचे सुख प्राप्त होईल. कुटुंबीयांसमवेत सामाजिक समारंभासाठी बाहेर फिरणे किंवा सहलीला जाणे घडेल. आणखी वाचा
मिथुन - अपूर्ण कामे पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे, असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात हर्षोल्हासाचे वातावरण राहील. आणखी वाचा
कर्क - शांतपणाने दिवस घालवा असे श्रीगणेश सांगतात. कारण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उद्विग्नता राहील. पोटदुखीचे विकार बळावतील. आणखी वाचा
सिंह - श्रीगणेश सांगतात की मानसिक अस्वस्थता राहील. कुटुंबीयांशी मतभेद होतील. जमीन, घर अथवा वाहनाची खरेदी किंवा खरेदीपत्र करायला दिवस योग्य नाही. आणखी वाचा
कन्या - विचार न करता साहस करण्यापासून सावधानतेचा इशारा श्रीगणेश देतात. भावनात्मक संबंध प्रस्थापित होतील. आणखी वाचा
तूळ - समतोल आणि दृढ निश्चयाने तुमच्या दिवसाची सुरूवात होईल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थप्रति काळजी घेण्याचं आवाहन श्रीगणेशजींनी केलंय. नवीन कपडे आणि दागिन्यांच्या खरेदीसाठी पैसा खर्च होईल. कुटुंबीयांसमेवत जे मतभेद झाले, ते दूर करावेत. आवश्यक निर्णय घेण्याचं आज टाळावे.
वृश्चिक -श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. शारीरिक आणि मानसिक प्रसन्नता वाटेल. कुटुंबातील व्यक्तींशी वागण्यात दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा
धनु - आज रागामुळे कुटुंबातील व्यक्ती आणि इतर लोकांशी संबंध दुरावतील. आपले बोलणे व वागणे भांडणाचे कारण ठरेल. दुर्घटनेपासून जपा. आणखी वाचा
मकर - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस प्रत्येक गोष्टीत लाभदायक आहे. मित्रांची भेट होईल. प्रिय व्यक्तींशी मुलाखत रोमांचक बनेल. आणखी वाचा
कुंभ - प्रत्येक काम सरळपणे होईल आणि त्यात यश मिळेल. नोकरी- व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. सरकारी कामे निर्विघ्नपणे पूर्ण होतील. आणखी वाचा
मीन - भीती आणि उद्विग्नता यातून दिवसाची सुरुवात होईल. शरीरात आळस आणि थकवा जाणवेल. कोणतेच काम पूर्ण न झाल्याने निराशा पैदा होईल. आणखी वाचा