आजचं राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२१: 'वृश्चिक' राशीच्या व्यक्तींना आज मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 07:18 AM2021-11-22T07:18:22+5:302021-11-22T07:22:02+5:30
Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष- विचारांच्या गतिशीलतेमुळे द्विधा मनःस्थिती जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. निर्णयाप्रत येऊ शकणार नाही. आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील. आणखी वाचा
वृषभ - आज द्विधा स्थितीतील व्यवहार आपणाला अडचणीत आणेल. महत्त्वाचा वेळ त्यासाठी खर्च करावा लागेल. आपला हट्टी स्वभाव सोडा अन्यथा कोणाशी चर्चा, विवादा दरम्यान संघर्ष होईल. आणखी वाचा
मिथुन - आजच्या दिवसाचा प्रारंभ शरीर आणि मनाच्या टवटवीतपणामुळे चांगला होईल. घरात किंवा मित्र आणि कुटुंबीयांसमवेत बाहेर मनपसंत भोजनाचा आनंद लुटाल. आणखी वाचा
कर्क - आज जास्त खर्च होण्याचा दिवस आहे. कौटुंबिक वातावरण पण फारसे समाधानकारक राहणार नाही. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेदाचे प्रसंग येतील. आणखी वाचा
सिंह - कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही असे श्रीगणेश सांगतात. मन विचारांत अडकून पडेल. आणखी वाचा
कन्या - सांप्रतकाली नव्या कामासंदर्भातील नियोजन योग्य प्रकारे करू शकाल. व्यापारी आणि नोकरदार यांना आजचा दिवस लाभदायक ठरेल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
तूळ- श्रीगणेशांच्या मते आज नोकरीच्या ठिकाणी आपणाला वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संतती विषयक काळजी वाटेल. दूरवरच्या प्रवासाचे नियोजन कराल. आणखी वाचा
वृश्चिक - सध्या शांत राहून वेळ घालवा असे श्रीगणेश सांगतात. रागावर नियंत्रण ठेवा. अनैतिक कामांपासून दूर राहा. नवे संबंध विचारपूर्वक प्रस्थापित करा. आणखी वाचा
धनु - आज बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयासाठी दिवस चांगला. सामाजिक सन्मान मिळेल. मित्रांशी मुलाखात होईल. त्यांच्या सोबत हिंडणे- फिरणे वा मनोरंजक स्थळी जाण्याचा योग येईल. आणखी वाचा
मकर - आज व्यापार धंद्यात मोठे यश मिळेल पण कायद्याच्या कचार्यात सापडू नका एवढी दक्षता घ्या. व्यापार उद्योगाच्या दृष्टीने भावी योजना सुफळ होतील. आणखी वाचा
कुंभ- आज बौद्धिक क्षमता, लेखनकार्य आणि नवनिर्मिती व्यवस्थित पूर्ण करू शकाल. विचार एकाच गोष्टीवर स्थिर राहणार नाही. सातत्याने बदल होत राहील. आणखी वाचा
मीन- श्रीगणेश आपणाला सूचना देतात की घर, वाहन इत्यादींची कागदपत्रे सांभाळून ठेवा. घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. आईचे आरोग्य बिघडेल. आणखी वाचा