आजचे राशीभविष्य - ५ नोव्हेंबर २०२०; 'या' राशीच्या व्यक्तींसाठी नवीन काम सुरू करायला आजचा दिवस उत्तम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 07:54 AM2020-11-05T07:54:17+5:302020-11-05T07:54:26+5:30

Todays Horoscope 5 November 2020 : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...

Todays horoscope - November 5, 2020 | आजचे राशीभविष्य - ५ नोव्हेंबर २०२०; 'या' राशीच्या व्यक्तींसाठी नवीन काम सुरू करायला आजचा दिवस उत्तम

आजचे राशीभविष्य - ५ नोव्हेंबर २०२०; 'या' राशीच्या व्यक्तींसाठी नवीन काम सुरू करायला आजचा दिवस उत्तम

Next


मेष -
विचारांची अस्थिरता अडचणीत आणेल. नोकरी व्यवसायाच्या क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण राहील, ज्यातून बाहेर पडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. लहान प्रवासाची शक्यता आहे. महत्त्वपूर्ण निर्णय न घेण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा

वृषभ -
फसव्या व्यवहारामुळे संघर्षात पडण्याचा संभव आहे. लेखक, कारागिर, कलाकार यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. वाकचातुर्य आज तुमचे काम यशस्वी करेल व दुसर्‍याला मोहून टाकेल. नवीन कामाला सुरूवात करण्यासाठी दिवस चांगला नाही असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

मिथुन -
आजचा दिवस लाभदायक जाईल अशी आशा करू शकता. सकाळपासूनच उत्साह आणि प्रसन्नता अनुभवाल. आर्थिक लाभ मिळेल व त्याच बरोबर भेटवस्तूही मिळतील. त्यामुळे दिवस खूप खुशीत जाईल, असे श्रीगणेश सांगतात. सगळ्यांबरोबर मिळून आनंददायक प्रवास ठरवण्याचीही शक्यता आहे. आणखी वाचा 

कर्क -
मनाची साशंकता व द्विधा निर्णय घ्यायला अतिशय कठिण करून सोडेल. कुटुंबीया बरोबर मतभेद झाल्याने मन उदास होईल. आईच्या स्वास्थ्याची चिंता लागून राहील. पैसा खर्च होईल. गैरसमज व वाद-विवाद यापासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा

सिंह -
श्रीगणेश म्हणतात की आज आपल्याला विविध प्रकारे लाभ होऊ शकतात. अशा वेळी थोडे गहाळ राहिलात तर लाभापासून वंचित राहाल, तिकडे लक्ष द्या. मित्र मंडळ, स्त्रीवर्ग व थोरामोठयांकडून लाभ होतील. नोकरी व्यवसायात पदोन्नतीचा संभव आहे. आणखी वाचा

कन्या -
नवीन काम सुरू करायला निर्मित योजना अमलात आणायला आज उत्तम दिवस आहे. व्यापारात लाभ होईल. जुने येणे वसूल होईल. नोकरदारांची पदोन्नती संभवते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरात ताळ- मेळ असेल. सरकारी कामेपूर्ण होतील. आणखी वाचा

तूळ -
संतती आणि स्वास्थ्य या संबंधी चिंता लागून राहील. नोकरी करणार्‍यांना वरिष्ठ किंवा सहकार्‍यांचे सहकार्य मिळणार नाही. विरोधी किंवा प्रतिस्पर्धी यांच्याबरोबर सखोल चर्चा करू नका, असा श्रीगणेश सल्ला देतात. आणखी वाचा

वृश्चिक -
गणेश सांगतात की आजचा दिवस सावधानीपूर्वक व्यतीत करावा लागेल. नवे कार्य सुरू करू नका. क्रोध आणि अनैतिक आचरण तुम्हाला अडचणीत आणतील. राजकीय अपप्रवृत्ती पासून दूर राहण्याचा व नवीन संबंध विकसित करण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. दुर्घटनेपासून दूर राहा. आणखी वाचा

धनु -
बौद्धिक, तार्किक, विचार- विनिमय आणि लेखन कार्य या साठी शुभ दिवस आहे. मनोरंजन, प्रवास, मित्राबरोबर भेटी, सुंदर भोजन, वस्त्र प्रावरणे, भिन्न लिंगीया बरोबर जवळीक या गोष्टी आजचा दिवस आनंदित बनवतील. सार्वजनिक मान- सन्मान वाढेल. आणखी वाचा

मकर -
श्रीगणेशांच्या कृपेने व्यापार धंद्यात वाढ होईल. आर्थिक दृष्ट्या लाभदायक दिवस असल्यामुळे पैशाच्या देवाण घेवाणीत सरळपणा राहील. कार्यकर्ते तसेच आपल्यावर अवलंबीत लोकांचे सहकार्य मिळेल. मात्र फायद्याच्या गुंतागुंतीपासून सावध राहा, असा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा

कुंभ -
आज तुम्ही संतती व स्वतःचे स्वास्थ्य या संबंधी चिंतीत राहाल. अपचन, पोटाचे दुखणे याचा त्रास होईल. विचारात वेगाने बदल होऊन मानसिक अस्थिरता जाणवेल. प्रवासात अडचणी येतील. म्हणून शक्य असेल तर प्रवास स्थगित करावेत असा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा

मीन -
शारीरिक व मानसिक भय वाटेल.नको त्या घटनामुळे तुमचा उत्साह कमी होईल. निद्रानाशाने त्रस्त व्हाल. धन आणि कीर्ती यांची हानी होईल. स्त्रीवर्ग तसेच वाणी यापासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. स्थावर मिळकत, वाहन इ. च्या समस्या होऊन चिंता वाढेल. आणखी वाचा
 

Web Title: Todays horoscope - November 5, 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.