आजचे राशीभविष्य - ८ नोव्हेंबर २०२०; भावनेच्या भरात अविचारी काम करू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 10:30 PM2020-11-07T22:30:08+5:302020-11-08T07:29:22+5:30

Todays Horoscope 8 November 2020 : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...

Today's horoscope - November 8, 2020 | आजचे राशीभविष्य - ८ नोव्हेंबर २०२०; भावनेच्या भरात अविचारी काम करू नका

आजचे राशीभविष्य - ८ नोव्हेंबर २०२०; भावनेच्या भरात अविचारी काम करू नका

Next

मेष - आपली आत्मीयता अधिक संवेदनशील बनेल.  त्यामुळे कोणाचे बोलणे किंवा वागणे यामुळे मनाला दुःख होईल. मानसिक भयाबरोबर शारीरिक अस्वस्थतेमुळे तम्ही बेचैन राहाल.  आणखी वाचा. 

वृषभ - चिंतेपासून मुक्तता मिळाल्याने स्फूर्ती आणि उत्साह अनुभवाल. हळवेपणा आणि काल्पनिकता यांच्या जगात वावराल. आपल्या अंतर्गत कला आणि साहित्य बाहेर यायला चांगला दिवस.  आणखी वाचा. 

मिथुन -  श्रीगणेश म्हणतात की आज तुम्हाला कामात सफलता मिळेल फक्त थोडा उशीर लागेल. तरीही प्रयत्न सुरू ठेवून पूर्ण करू शकाल. आणखी वाचा. 

कर्क -  शारीरिक व मानसिक सुख मिळेल. मित्र आणि स्वजन यांच्याबरोबर आजचा दिवस खूप आनंदात व उल्हासात जाईल असे श्रीगणेश सांगतात.आणखी वाचा. 

सिंह -  चिंता लागून राहिल्याने स्वास्थ्य बिघडेल. उग्र स्वभावाने किंवा वादविवादामुळे कोणाबरोबर संघर्ष होईल. कोर्ट कचेरीच्या कामात सावधानीपूर्वक पाऊले टाका.  आणखी वाचा. 

कन्या -  तन मनाच्या स्वस्थते बरोबर आजचा आनंदी दिवस तुम्हाला विविध लाभ मिळवून देईल. व्यापारी आणि नोकरी करणार्‍यांना आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा. 

तूळ - गणेशजी सांगतात की आज तुमची सर्व कामे यशस्वी होतील. मान-सन्मान वाढेल. ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. व्यापाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. कौटुंबीक आयुष्य आनंददायी राहिल. संसारसुख मिळेल. 

वृश्चिक - आळस, थकवा आणि चिंता यामुळे कामाचा उत्साह मंद पडल्याचे जाणवेल. विशेषतः संततीकडूनच तुम्हाला चिंता लागेल.  आणखी वाचा. 

धनु -  अनैच्छिक घटना, आजारपण, राग यामुळे आपला मानसिक व्यवहार हताश झालेला असेल. म्हणून रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा. 

मकर -  कामाचा व्याप आणि मानसिक ताण यातून सुटका होऊन मित्र व संबंधितांबरोबर आनंदात आजचा दिवस व्यतीत कराल. भिन्न लिंगी व्यक्तिंचे आकर्षण वाढेल.  आणखी वाचा. 

कुंभ -  श्रीगणेश म्हणतात की, आज आपल्याला कामात सफलता व यश मिळेल. कुटुंबातील सदस्याबरोबर अधिक स्नेहाचे प्रेमाचे व्यवहार होतील.  आणखी वाचा. 

मीन -  श्रीगणेश सांगतात की तुमच्या अंगी असलेली सृजनात्मकता बाहेर पडून तुम्ही साहित्य क्षेत्रात लेखन किंवा पठण कार्यात रूची घ्याल. हृदयाची कोमलता प्रियजनांच्या जवळ आणेल. आणखी वाचा. 

Web Title: Today's horoscope - November 8, 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.