आठवड्याचे राशीभविष्य - 1 ते 7 नोव्हेंबर 2020, 'या' राशीच्या व्यक्तींना सुखद अनुभव मिळणार, प्रियजनांकडून लाभ होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 09:44 AM2020-11-03T09:44:34+5:302020-11-03T09:52:40+5:30

Weekly Horoscope 1 November to 7 November 2020 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

Weekly Horoscope 1 November to 7 November 2020 | आठवड्याचे राशीभविष्य - 1 ते 7 नोव्हेंबर 2020, 'या' राशीच्या व्यक्तींना सुखद अनुभव मिळणार, प्रियजनांकडून लाभ होणार

आठवड्याचे राशीभविष्य - 1 ते 7 नोव्हेंबर 2020, 'या' राशीच्या व्यक्तींना सुखद अनुभव मिळणार, प्रियजनांकडून लाभ होणार

Next

मेष 

 

आठवड्याच्या सुरुवातीस आपण कामावर अधिक लक्ष देऊ शकाल. आठवड्याच्या मध्यास वाणीचे प्रभुत्व असणाऱ्या क्षेत्रात थोडी काळजी न घेतल्यास आपल्या प्रयत्नांवर प्रश्न उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या अखेरीस आपल्या व्यावसायिक क्षेत्राचा विस्तार करण्याची संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी समाधान लाभेल. आपल्या व्यवसायात यश प्राप्त झाल्याने सामाजिक प्रतिष्ठेत सुद्धा वृद्धी होईल. असे असले तरी काही अचानक झालेल्या खर्चामुळे आपणास नैराश्य येण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरवातीस तत्वज्ञान व साहित्याप्रती आपली गोडी वाढेल. अभ्यासासाठी लोकांशी चर्चा करण्याची संधी मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात कुटुंबासाठी आपण केलेले प्रत्येक कार्य प्रशंसेस पात्र ठरेल व त्यामुळे आपल्या कौशल्याची प्रचिती येईल. संतती विषयक काही समस्या असल्यास ती धीराने सोडवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आपण कितीही प्रामाणिक प्रयत्न केलेत तरी त्यांचे समाधान होणार नाही. आठवड्याच्या मध्यास इतरांकडून अपेक्षित प्रेम व आदर आपणास मिळत नसल्याची आपली भावना होईल. आपल्या वैवाहिक जीवनात काही कमतरता किंवा असमाधान असल्याचे जाणवेल. त्यास मुख्यत्वे आपला अहंकार किंवा श्रेष्ठत्वपणाची भावना कारणीभूत असू शकेल, तेव्हा संबंधातील समर्पण वाढवावे. आपल्या आरोग्य विषयक गरजेत बदल होत राहील. आपण अधिक तंदुरुस्त व निरोगी राहण्यासाठी आहारात कोशिंबीर व फळांना समाविष्ट करावे. दीर्घ काळा पासून एखादा आजार असल्यास तो दूर होईल.

वृषभ 

शासन तसेच वरिष्ठांशी चांगले संबंध असल्यामुळे व्यावसायिक आघाडीवर विशेषतः नोकरीतील कार्यात यशस्वी होऊ शकाल. आठवड्याच्या मध्यास व्यवसायासाठी चांगले आयोजन करू शकाल. ह्या व्यतिरिक्त आपणास भविष्यात लाभदायी ठरू शकतील अशा अनेक लोकांच्या संपर्कात आपण याल. आपली वक्तृत्व कला ह्या दरम्यान खुलून उठेल. आयात - निर्यातीशी संबंधित व्यापाऱ्यांना व्यावसायिक लाभासाठी थोडी प्रतीक्षा सहन करावी लागेल. आठवड्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे मन काहीसे व्याकुळ राहिले तरी उर्वरित दिवसात अभ्यासात प्रगती होऊ शकेल. आपले आयोजन आपल्या प्रगतीसाठी मदतरूप होईल. आठवड्याचा पहिला दिवस वगळता प्रियव्यक्तीसह प्रेमाचा सुखद अनुभव घेऊ शकाल. मात्र, विशेषतः पूर्वार्धात संबंधांच्या बाबतीत शक्य तितकी पारदर्शकता वाढवावी लागेल. आठवड्याच्या उत्तरार्धात कुटुंबीय, वैवाहिक जोडीदार व संततीप्रती आत्मीयता सुद्धा वाढेल. तन - मन प्रसन्न राहील. आपल्यातील परोपकाराच्या भावनेमुळे आपण लोकसेवेची कार्ये कराल. आपली हरवलेली वस्तू परत मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरवातीस वाहन जपून चालवावे लागेल. शक्य असल्यास दूरवरचे प्रवास टाळावेत. अभ्यासा दरम्यान ध्यान - धारणा केल्यास उत्तम मानसिक स्वास्थ्य लाभेल. उत्तरार्धात आरोग्य चांगले राहिले तरी एकंदरीत आरोग्य निरोगी राहण्याची शक्यता कमी असल्याने भोजनातील नियमितपणा पाळावाच लागेल.

मिथुन 

आठवड्याच्या सुरुवातीस वैवाहिक जोडीदार व कुटुंबियां कडून सकारात्मक प्रतिसाद मिळवू शकाल. ह्या आठवड्यात कुटुंबाशी संबंधित न उलगडलेल्या प्रश्नांचे व समस्यांचे सुखद निराकरण होऊ शकेल. सामाजिक व सार्वजनिक जीवनातील आपली सक्रियता वाढेल. व्यावसायिक प्रगतीसाठी आठवड्याचा पहिला दिवस उत्तम आहे. नंतरच्या दोन दिवसात संबंध टिकवून ठेवण्यासाठी आपणास अधिक प्रयत्न करावे लागतील. तसेच व्यावसायिक आघाडीवर कोणताही निर्णय घेण्यासाठी किंवा हाती असलेली कामे पूर्ण करण्यासाठी सुद्धा अधिक प्रयत्न करावे लागतील. आठवड्याच्या पूर्वार्धात शक्यतो उसनवारी करणे टाळावे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चढ - उतारीचा असल्याने अभ्यासाकडे त्यांना अधिक लक्ष द्यावे लागेल. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यापारी वर्गास वसुलीसाठी केलेल्या प्रवासातून लाभ होतील. उत्तरार्धात प्राप्तीत वाढ करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आठवड्याच्या मध्यास सर्दी, खोकला, पित्त प्रकोप, वात विकार, मणक्याचे विकार किंवा पाठदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. अपघाताच्या शक्यतेमुळे अग्नी व पाण्या पासून दूर राहावे.

कर्क 

आठवड्याच्या सुरुवातीस आपण व्यावसायिक बाबींवर अधिक लक्ष केंद्रित कराल. कोणत्याही प्रकारे आपले लक्ष व्यापारातील किंवा नोकरीतील प्रगतीवर केंद्रित असल्याने त्यानुसार आपण पाऊल टाकाल. ह्या आठवड्यात आपल्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर नोकरीत आपली कामगिरी उत्कृष्ठ होऊन आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. ह्या आठवड्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारे लाभ होण्याची शक्यता अधिक आहे. विशेषतः पूर्वार्धात आपणास प्रलंबित लाभ मिळाल्याने दिलासा मिळेल. आठवड्याच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक कार्यात आपली व्यस्तता वाढल्याने आपल्या व्यक्तिगत संबंधांसाठी आपण वेळ देऊ शकणार नाही, मात्र दुसऱ्या व तिसऱ्या दिवसा पासून ह्या स्थितीत सुधारणा होईल. आठवड्याच्या मध्यास मनाच्या व्याकुळतेमुळे एकांतात राहणे हितावह ठरेल. उत्तरार्धात आपण पुन्हा उत्साहित होऊन प्रियव्यक्तीशी जवळीक वाढविण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आरोग्य चांगले राहिले तरी आठवड्याच्या मध्यास डोकेदुखी, आळस इत्यादींचा त्रास संभवतो.

सिंह 

आठवड्याच्या सुरुवातीस मातुल घराण्यातील एखाद्या मांगलिक कार्यात आपण व्यस्त राहाल किंवा त्यांच्या कडून आपणास काही लाभ होईल. सुरवाती पासूनच आपण व्यावसायिक कार्यात अधिक लक्ष केंद्रित कराल. हा आठवडा नवीन सुरवात करण्यासाठी किंवा कामाच्या विस्तारासाठी अनुकूल असल्याने त्याचा फायदा उचलल्यास व त्या दृष्टीने विचारपूर्वक पाऊल टाकल्यास नक्कीच फायदा होऊ शकेल. साहित्य लेखन तसेच कला क्षेत्रात विशेष स्वारस्य दाखवाल. प्रियव्यक्तीचा सहवास आपणास रोमांचित करेल. आपली भाग्यवृद्धी होईल. नोकरीत सहकाऱ्यांच्या सहकार्यावर अवलंबून न राहता स्वबळावर मार्गक्रमण करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उत्तरार्धात आपणास विविध मार्गाने लाभ होण्याची शक्यता आहे. कोणतेही कार्य करण्यात उत्साह टिकून राहील. असे असले तरी शेवटच्या दिवशी आपणास थकवा व सुस्ती जाणवेल. मानसिक थकवा आल्याने आपला आध्यात्मिकतेकडे कल वाढेल. आठवड्याचा अखेरचा दिवस वगळता विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा बहुतांशी चांगला आहे.

कन्या 

आठवड्याच्या पहिल्या दिवशी आपले मन काहीसे बेचैन राहण्याची किंवा शरीरास थकवा जाणवण्याची शक्यता अधिक आहे. अशा स्थितीत शक्यतो नव्या कामाची सुरवात करू नये. वैवाहिक जोडीदाराशी वाणी व वर्तनात आपल्या क्रोधास संयमित ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कोणतेही कार्य किंवा संबंध बिघडण्यास हा क्रोध कारणीभूत ठरू शकेल. आठवड्याच्या सुरवातीस आपणास नशिबाची साथ कमीच मिळणार असली तरी मध्यास व्यावसायिक बाबींवर अधिक लक्ष केंद्रित करून प्राप्तीत वाढ करण्याचा प्रयत्न आपण कराल. त्यामुळे आपल्यावर कार्यभार वाढेल व संपर्क साधण्यात व्यस्त राहिल्याने स्वतःसाठी आवश्यक वेळ काढू शकणार नाही. उत्तरार्धात जिवलग लोकांच्या कार्यात इच्छे - अनिच्छेने सहभागी व्हावे लागेल. संतती संबंधी आपण चिंतीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामाच्या धावपळीत कुटुंबास योग्य तितका वेळ देऊ शकणार नाही. आठवड्याच्या अखेरीस भावंडांशी संबंध दृढ होतील. आपल्या भोवती नातेवाईक व मित्रांचा गराडा असेल. शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या अडचणी व विलंबास सामोरे जावे लागेल.

तूळ

आठवड्याच्या सुरुवातीस कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणी आपल्या कामाच्या प्रशंसेने आपण आनंदित व्हाल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा लाभदायी आहे. आपला उत्साह द्विगुणित होईल. कौटुंबिक बाबींकडे आपण अधिक लक्ष द्याल व खोळंबलेल्या काही कार्यांचे किंवा वादांचे निराकारण करण्यासाठी सक्रिय व्हाल. मात्र, दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी संततीच्या कारकिर्दी विषयक निवडीच्या बाबतीत आपण मानसिक दृष्ट्या काहीसे गोंधळून जाल. अनिर्णायक मनःस्थितीमुळे आपला गोंधळ उडेल. हा आठवडा आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रतिकूल असल्याने आहारातील नियमितपणा टिकवून ठेवावा. शक्यतो प्रवासाचे आयोजन टाळावे. आठवड्याच्या उत्तरार्धात आपल्या स्थितीत सुधारणा होऊन आपण आत्मविश्वासाची पुनर्प्राप्ती करू शकाल. वडिलांच्या संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे. देशांतर्गत कार्यांसाठी किंवा बहुराष्ट्रीय संस्थेत नोकरीशी संबंधित कार्यांसाठी नवी दिशा सापडू शकेल. व्यावसायिक कारणांसाठी दूरवरचे प्रवास करण्यास उत्तरार्ध अनुकूल आहे. प्रणयी किंवा वैवाहिक जीवनाचे सौख्य उपभोगण्यासाठी आठवड्याचा पहिला दिवस व अखेरचा दिवस जास्त अनुकूल आहे.

वृश्चिक

आठवड्याच्या सुरुवातीस नोकरी करणाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरी बद्धल प्रशंसित केले जाईल व त्याचा फायदा होत असल्याचे नजीकच्या भविष्यात दिसून येईल. कार्यालयात मान - प्रतिष्ठा वाढल्याने घरात सुद्धा शांतता नांदेल व त्यामुळे वैवाहिक जोडीदार, संतती व इतर कुटुंबीय ह्यांच्यासह आनंदात राहू शकाल. असे असले तरी व्यावसायिकांना राजकीय त्रास होऊ शकतो. काही कायदेशीर अडथळ्यांमुळे व्यापारी कामात विलंब होऊ शकतो. सध्या कायद्याच्या विरुद्ध जाऊन कोणतेही कार्य केल्यास व्यावसायिक आघाडीवर आपली प्रतिमा मलीन होऊ शकते. पैतृक संपत्तीतून होणाऱ्या प्राप्तीत खंड पडू शकतो. प्रियव्यक्तीच्या सहवासात आनंदात वेळ घालवू शकाल. चित्रपट, रात्री भोजन किंवा मनोरंजनाच्या इतर प्रवृत्तीत सहभागी व्हाल. आठवड्याच्या मध्यास क्रोधावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आर्थिक चणचण असता कर्ज घेतल्यास चिंतेत भर पडेल. विद्यार्थ्यांनी इतर प्रवृत्ती सोडून अभ्यासाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. उत्तरार्धात आपण पुन्हा उत्साहाने कामास लागाल. संबंधातील तणाव संपर्काद्वारे दूर करू शकाल. व्यापार - व्यवसाय किंवा नोकरीत सुद्धा नव्याने सुरुवात करू शकाल. आपणास आर्थिक लाभ झाल्याने मन प्रसन्न होईल.

धनु 

आठवड्याच्या सुरुवातीस मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. प्रेमीजनांचा प्रणय अधिक दृढ होईल. प्रणयी जीवनात उत्साहाने पुढाकार घेऊन आपले प्रेम व्यक्त कराल. आपल्यात एकमेकां बद्धल आकर्षण वाढेल. कामाच्या ठिकाणी सुद्धा भिन्नलिंगी व्यक्तींशी आपली जवळीक वाढू शकेल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. जर आपण कारकीर्दीस नव्याने सुरवात करत असाल तर साखरपुडा करू शकता व कारकिर्दीत स्थैर्य लाभल्या नंतर विवाह बंधनात अडकू शकता. कौटुंबिक वातावरणात सौहार्दता असल्याचे दिसून येईल. आठवड्याच्या मध्यास आपला काम करण्याचा उत्साह वाढेल. शेअर्स बाजार किंवा दलाली सदृश्य व्यवसायाशी संबंधित असणाऱ्यांना खूप मोठा फायदा होऊ शकेल. व्यापार - व्यवसाय सुद्धा उत्तम चालल्यामुळे आपणास मानसिक दिलासा मिळेल. नोकरीत उत्तम प्रगती साधू शकाल. शैक्षणिक जीवनात सुरवातीस अनुकूल परिस्थिती असल्याने परिश्रम वाढविल्यास आपणास उत्तम परिणाम मिळू शकेल. जर अभ्यासात काही समस्या असेल तर सहाध्यायी किंवा वडिलधाऱ्यांची आपणास मदत मिळू शकेल. आरोग्याच्या दृष्टीने सध्या आपणास नेहमीच्या चहा ऐवजी ग्रीन टी घेणे फायदेशीर ठरू शकेल. भोजनाचा अतिरेक टाळावा.

मकर 

थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण लक्षात ठेवून आता पासूनच जर अनावश्यक खर्चात कपात करून थोडी बचत केलीत तर आपोआपच आपले भावी सुरक्षित होऊ शकेल. आपण आत्मविश्वासासह त्वरित एखादा निर्णय घेऊन कार्यात प्रगती करू शकाल. व्यावसायिक कार्यात आपल्या कष्टानुसार फळ मिळेल. दैनंदिन कार्यात थोड्या विलंबाने ती पूर्णत्वास जातील. नोकरी करणाऱ्यांना कार्य सिद्धीसाठी आठवड्याचा उत्तरार्ध अनुकूल आहे. आपण आयोजनपूर्वक मार्गक्रमण कराल परंतु आपणास मिळणाऱ्या लाभात अनिश्चितता राहील. हे विशेषतः आर्थिक आयोजन करताना लक्षात ठेवावे. दूरवर राहणारे स्नेहीजन, मित्र - मैत्रिणी ह्यांच्या कडून काही लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्याशी झालेला संपर्क आपल्यात नवीन ऊर्जेची भर घालेल. प्रेम संबंध टिकवून ठेवण्यासाठी आपणास सध्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यास व प्रवेश ह्यासाठी धावपळ करावी लागेल. सध्या अभ्यासा विषयी कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नये. ह्या आठवड्यात विशेषतः इतरांची काळजी केल्याने मानसिक व शारीरिक आरोग्य नरम - गरम राहील. उत्तरार्धात आहाराची विशेष काळजी घ्यावी.

कुंभ 

आठवड्याच्या सुरुवातीस काहीतरी नवीन करण्याच्या भावनेने आपण वाटचाल कराल. आपण मित्र व आप्तांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. प्रत्येक आघाडीवर समतोल साधण्याच्या हेतूने कुटुंबियांच्या खुशीवर लक्ष देऊन कुटुंबातील प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. सध्या कुटुंबियांसाठी खर्च केल्या नंतर आपल्या भावना व आत्मीयता समजून न घेता तो आपल्या कर्तव्याचाच एक भाग असल्याचा समज कुटुंबीय करून घेतील व म्हणून कुटुंबियांकडून आपली प्रशंसा होण्याची आशा आपण बाळगू नये. त्यांच्यासाठी आपण केलेल्या कार्यांची अखेर ते नोंद घेतील व भविष्यात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील तेव्हा लगेच निराश होऊ नका. प्रणयी जीवनासाठी आठवड्याचे मधले दिवस अनुकूल आहेत. आपणास प्रियव्यक्तीशी संबंधित एखादी काळजी सतावेल. जर आपण समजूतदारपणा दाखविला तर तणावाची परिस्थिती निर्माण होणार नाही. विद्यार्थ्यांना योग्य आयोजन करून अभ्यास केल्यास चांगले फळ मिळू शकेल. आरोग्याच्या बाबतीत विशेषतः घशाचे विकार किंवा नेत्र विकार होण्याची शक्यता आहे.

मीन 

कौटुंबिक जीवन एकंदरीत आनंदी व समाधानी असेल. नवीन कामाच्या सुरवातीला हा आठवडा अनुकूल आहे. हाती घेतलेली कामे सहजतेने पूर्ण होतील. व्यापारीवर्ग त्यांच्या व्यापाराचा विस्तार व त्या संबंधीचे आयोजन यशस्वीपणे करू शकतील. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना बोनस, बक्षिसाच्या माध्यमातून तसेच व्यापाऱ्यांना कामातील वृद्धीच्या माध्यमातून लाभ होईल. असे असले तरी सध्या वरिष्ठांशी कोणत्याही महत्वाच्या चर्चे दरम्यान वाद घालू नये. व्यापाऱ्यांना सुद्धा शासकीय किंवा कायदेशीर प्रश्नांचा अडसर येऊ शकतो. आपणास स्वतःची सार्वजनिक प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. प्रणयी जीवनात सध्या काही समस्या निर्माण होईल असे दिसत नाही. जे आधीपासूनच संबंधात आहेत ते आपल्या जोडीदाराच्या सहवासाचा उपभोग घेऊ शकतील. आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडू इच्छित असाल तर एखाद्या व्यक्तीस बघून आपल्या मनात प्रेमाचे अंकुर फुटण्याची किंवा प्रियव्यक्तीची भेट होण्याची शक्यता सुद्धा आहे. एखादी सहल, प्रवास, रुचकर भोजन, वस्त्रालंकारांची खरेदी, चित्रपट व बाजारहाट करण्यासाठी पैसा खर्च करू शकाल. शैक्षणिक कार्यात यशस्वी व्हाल, मात्र त्यासाठी अधिक परिश्रम करावे लागतील. आपण गूढ, रहस्यमय विद्या व अध्यात्मात विशेष स्वारस्य दाखवाल. सध्या ज्यांना रक्ताभिसरणाचा त्रास असेल त्यांनी विशेष काळजी घ्यावी.

 

Web Title: Weekly Horoscope 1 November to 7 November 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.