आठवड्याचे राशीभविष्य - 10 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 10:22 AM2019-11-10T10:22:52+5:302019-11-10T10:24:11+5:30
कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...
मेष
आपणास गेल्या आठवड्याच्या अखेरीस शारीरिक त्रास विशेषतः डोळयांच्या विकारांचा त्रास झाला असेल तो ह्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी दुपार पर्यंत तसाच राहून नंतर तो दूर होईल. मनाने सुद्धा आपण आनंदी राहाल. खोळंबलेली कामे सुद्धा नियोजनपूर्वक पूर्ण करू शकाल. मंगल प्रसंगात सहभागी होता येईल. विद्यार्थ्यांना हा आठवडा अभ्यासासाठी चांगला आहे. अभ्यासातील गोडी वाढून भविष्यातील कारकिर्दीच्या दृष्टिकोनातून सक्रिय व्हाल. स्नेहीजन व मित्रांच्या सहवासाने आनंदित व्हाल. संबंधातील सुख उपभोगू शकाल. अनेक नवीन लोकांच्या ओळखी होतील... आणखी वाचा
वृषभ
आठवड्याच्या पूर्वार्धात आपणास कार्यात यश व कीर्ती लाभ होईल. कुटुंबियांसह आनंदात दिवस घालवू शकाल. आर्थिक लाभ मिळू शकतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. मित्र व कुटुंबियांसह मनोरंजन व आनंद - प्रमोद करण्यात दिवस घालवू शकाल. उत्तम वाहनसौख्य लाभेल. अर्थात ह्या सर्वांसाठी खर्च सुद्धा होईल. परंतु तो आपण आनंदाने व स्वखुशीने कराल. भिन्नलिंगी व्यक्तींप्रती आकर्षण होऊन त्यांचा सहवास घडू शकेल. सामाजिक मान - सन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आठवड्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा
मिथुन
व्यापक दृष्टिकोनातून विचार केल्यास सध्या आपल्या शरीरात स्फूर्ती व मनात उत्साह ह्यांचा अभाव असल्याचे जाणवेल. असे असले तरी, आठवड्याची सुरवात आपल्यासाठी चांगली होईल. आपण व्यावसायिक कामात लक्ष घालू शकाल व काही प्रलंबित लाभ मिळाल्याने आर्थिक स्थितीत सुद्धा सुधारणा होऊ शकेल. दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळू शकेल. आठवड्याच्या मध्यास आपले मन बेचैन राहील. निद्रानाशाचा त्रास संभवतो. अशा परिस्थितीत आपली मानसिक शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपणास काहीतरी करावेच लागेल... आणखी वाचा
कर्क
सध्या व्यावसायिक आघाडीवर झटपट पैसे कमविण्याच्या फंदात पडू नका. नोकरी - व्यवसायातील परिस्थिती एकंदरीत अनुकूल असली तरी कामात कष्ट वाढविण्यास तयार राहावे लागेल. सुरवातीस आपले मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. दूरवरच्या लोकांशी आपले संपर्क वाढतील. जन्मभूमी पासून दूरवरच्या ठिकाणी करीत असलेल्या कामात प्रगती होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुखशांती लाभेल. आजवर जपून ठेवलेल्या संबंधांमुळे व्यावसायिक क्षेत्रात सरकार किंवा विविध संस्थेतील उच्च पदस्थांची कृपादृष्टी होऊन आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल... आणखी वाचा
सिंह
कोणत्याही प्रकारचे अनिष्ट टाळण्यासाठी क्रोध नियंत्रित ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. प्रेम - प्रकरणात संथ गतीने प्रगती झाली तरी त्यात कटुता येण्याची सुद्धा शक्यता आहे. आजारी व्यक्तीस नवीन उपचार किंवा शस्त्रक्रियेसाठी आठवड्याचा पहिला दिवस प्रतिकूल आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी दुपार नंतर कुटुंबीय, कार्यालयीन सहकारी व वरिष्ठांशी संबंधात सलोखा निर्माण होऊ शकेल. समाजात आपली मान - प्रतिष्ठा वाढेल. आपण सध्या कामाचा विस्तार किंवा नवीन सुरवात करण्यासाठी संपर्क साधण्यावर भर द्याल... आणखी वाचा
कन्या
आठवड्याच्या पूर्वार्धात आपणास जी काही प्राप्ती होईल त्यातील काही भाग निस्वार्थपणे सेवा कार्यासाठी आपण खर्च कराल. धार्मिक व जनसेवेच्या कार्यात सहभागी होऊन आपणास प्रसन्नता लाभेल. पूर्वार्धात आपणास आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अभ्यासात लक्ष कमी लागले तरी धार्मिक बाबतीत काही नवीन माहिती मिळविण्यासाठी आपण सक्रिय व्हाल. आठवड्याच्या मध्या पासून परिस्थितीत खूप बदल होईल. आपणास तजेला व प्रसन्नता जाणवेल. एखादी भेटवस्तू मिळाल्याने आपण आनंदित व्हाल... आणखी वाचा
तूळ
आठवड्यात घरी पाहुण्यांची वर्दळ राहील. आपण सामाजिक कार्य, प्रसंग इत्यादी बाबतीत अधिक लक्ष घालाल व त्यामुळे मित्रांसह मेजवानी, सहल ह्यांचे आयोजन होऊ शकेल. मित्र, नातेवाईक ह्यांच्या सहवासातच आठवड्याचा बहुतांश वेळ घालवू शकाल. मनात आनंद व्यापून राहील. व्यापारात भागीदारीतून लाभ होऊ शकेल. ह्या आठवड्यात वडिलधाऱ्यांपासून आपला फायदा होईल. पैतृक संपत्तीशी संबंधित कामातून सुद्धा फायदा होईल. तसेच एखाद्या बाबतीत काही गुंता असल्यास त्याची उकल होईल. आठवड्याच्या मध्यास खर्चात वाढ झाल्याने आर्थिक चणचण जाणवेल... आणखी वाचा
वृश्चिक
आठवड्याच्या सुरवातीस आपण रोमँटिक व्हाल. त्यामुळे भिन्नलिंगी संबंधांकडे आपला कल अधिक होईल. पूर्वार्धात आपण व्यावसायिक आघाडीवर सुद्धा सक्रिय राहाल. नोकरी करणाऱ्यांना आपले कौशल्य सिद्ध करून प्रगतीची वाट निर्माण करण्याची संधी लाभेल. प्राप्तीची नवीन साधने उभारण्यात आपण सक्रिय राहाल. परंतु हे प्रयत्न करताना चुकीच्या कल्पनेत रममाण होऊ नका, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचा गंभीरतेने विचार कराल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूलतेचा आहे... आणखी वाचा
धनु
जर दूरगामी विचार केला तर आपण अनेक भ्रामक स्थितींचा सामना करत असाल परंतु त्याचा अर्थ असा नव्हे कि आपण आपले प्रयत्न सोडून द्यावेत. खरेतर सध्या आपल्यातील उत्साह जागरूक करण्याची गरज आहे. तसे केल्याने अनेक आव्हानांना आपण सहजपणे सामोरे जाऊ शकाल. कुटुंबियां बरोबरच आपल्या प्रिय व्यक्तीस आपण महत्व देऊन त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास शक्य तितके प्रयत्न कराल. आपणास संबंधास योग्य वेळ देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. जस जसे दिवस जातील तसे आपण जीवनाप्रती सकारात्मक दृष्टिकोन बाळगून प्रत्येक समस्या शांतिपूर्वक सोडवण्याची वृत्ती अंगिकारू शकाल... आणखी वाचा
मकर
आठवड्यात आपण जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी व्हाल. त्याच बरोबर आपणास मनोरंजन सृष्टीत वावरण्याची संधी सुद्धा मिळू शकेल. प्रेम - प्रकरणाकडे आपला अधिक कल असेल. भिन्नलिंगी व्यक्ती किंवा वैवाहिक जोडीदाराशी आपला सलोखा राहील असे स्पष्टपणे दिसत आहे. व्यावसायिकांचा भागीदारांशी लाभदायी विचार - विनिमय होऊ शकेल. सरकारी कामातील अडचणी दूर होतील. आठवड्याच्या सुरवातीस कुटुंबाशी संबंधित बाबींकडे आपण अधिक लक्ष देऊन त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल... आणखी वाचा
कुंभ
आठवड्यात मागील अपयश किंवा चुकांवर आंसू ढाळत बसण्या ऐवजी त्या परिस्थितीत सुधारणा करून यशस्वी होण्याचा प्रयत्न आपण कराल. सुरवातीपासूनच आपल्या मनात भावना दाटून येतील. मित्र, स्वकीय व नातेवाईकांच्या सहवासाने आपले मन प्रसन्न होईल. मित्रमंडळासह वेळ चांगला घालवता येण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर कुटुंबियांना सुद्धा आपले प्राधान्य असल्याने त्यांच्या सुखासाठी अतिरिक्त प्राप्ती करण्यात व अधिक कष्ट करण्यात आपण मागे राहणार नाहीत. तसे केल्याने कुटुंबात आपला मान वाढेल... आणखी वाचा
मीन
आठवड्याच्या सुरवातीस आपल्यात नवीन उत्साह व नवीन आशावाद असल्याचे जाणवेल. त्यामुळे जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने बघून आपण एखादे नवीन आयोजन करण्यासाठी, नवीन संबंध जोडण्यासाठी किंवा सध्याचे संबंध उच्च स्तरावर नेण्यासाठी सक्रिय होण्याची शक्यता आहे. आपल्या स्वतःसाठी खर्च करण्यात आपण मागे राहणार नाहीत. त्याने आपल्या खिशावर ताण पडणार नाही, कारण पूर्वार्धातच आपण प्राप्तीवर लक्ष केंद्रित करून त्याची तरतूद करून ठेवलेली असेल. पैश्यांचे महत्व आपणास माहित असल्याने आपण बचत सुद्धा कराल... आणखी वाचा