आठवड्याचे राशीभविष्य - 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 10:42 AM2019-08-11T10:42:49+5:302019-08-11T10:43:52+5:30
कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...
मेष
आठवड्याच्या सुरुवातीस काही त्रास जरी झाला तरी, दुसऱ्या पर्वात अनुकूलता लाभेल. ह्या आठवड्यात नोकरी करणाऱ्याना सावध राहावे लागेल. वरिष्ठांशी वाद होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. व्यापाऱ्यांनी नवीन प्रकल्पा पासून दूर राहणे हितावह होईल. आठवड्याचे दुसरे पर्व अनुकूलतेचे आहे. धन लाभ संभवतो. कोर्ट - कचेरीच्या कामात सुद्धा यशस्वी होऊ शकाल. सर्व कामे सहजपणे होतील. आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल... आणखी वाचा
वृषभ
आठवडा आपल्यासाठी चांगला असला तरी आपल्या हट्टी स्वभावामुळे आपण स्वतःचे नुकसान करून घ्याल. मात्र, ह्या आठवड्यात एखादे महत्वाचे काम झाल्याने आपली यशस्विता वाढेल. वरिष्ठांशी संवाद साधताना संयमित राहावे. नोकरी - व्यवसायात आपणास विशेष लाभ होऊ शकेल. नवीन वस्त्र प्राप्त होतील. आपला आत्मविश्वास वाढेल... आणखी वाचा
मिथुन
आठवडा आपणास मिश्र फले देणारा आहे. आपणास व्यापार - व्यवसायात लाभ होऊ शकेल. नोकरी - व्यवसायात लाभ होणार असला तरीही, नोकरी करणाऱ्यांना सावधगिरी बाळगावी लागेल. कोणाला उसने पैसे दिले असल्यास ते परत मिळतील. वरिष्ठ व वडीलधारी मंडळी ह्यांची आपल्यावर कृपा दृष्टी राहील. आठवड्याच्या दुसऱ्या पर्वात धार्मिक व सामाजिक कार्यात खर्च होईल. सरकारी कामात आपणास यश प्राप्ती होईल. आठवड्यात कोर्ट - कचेरी पासून दूर राहण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे... आणखी वाचा
कर्क
आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आपणास घाई - गर्दी टाळावी लागेल. घाईघाई व हट्टीपणा ह्यामुळे आपले नुकसान होण्याची शक्यता आहे. जमीन - जुमल्याच्या कामात सुद्धा सावध राहावे लागेल. एखाद्या अचानकपणे होणाऱ्या खर्चास सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल. कार्यात यशस्वी झाल्यामुळे आपली कीर्ती वाढेल. स्त्रीया वस्त्रालंकार खरेदी करू शकतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम आहे. भावंडांशी संबंध सामान्यच राहतील... आणखी वाचा
सिंह
आठवडा आपल्यासाठी अंशतः चांगला राहील. नोकरी करणाऱ्यांना सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. अनावश्यक कार्यात पैसा खर्च झाल्याने आपण चिंतीत व्हाल. विरोधकांशी वाद न घालण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. काही ना काही कारणाने मनात नकारात्मक विचार येऊन मानसिक उद्विग्नता वाढेल. आठवड्याचा उत्तरार्ध मात्र चांगला राहील. वरिष्ठांची आपल्यावर कृपादृष्टी राहील. नवीन कामात आपले लक्ष लागेल.आपण व्यापार वृद्धीचा विचार करू शकाल... आणखी वाचा
कन्या
आठवड्याची सुरवात आपणास आत्मविश्वासाने करावी लागेल. सरकारी कामात यशस्वी व्हाल. कोर्ट - कचेरीच्या कामात सुद्धा यश प्राप्ती होईल. एखाद्या खास व्यक्तीच्या सहवासाचा आपणास भविष्यात खूप मोठा फायदा होईल. ह्या आठवड्यात यश आपणास गवसणी घालेल. मात्र, एखादा दीर्घ मुदतीचा प्रवास आपणास टाळावा लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित होऊ शकेल. धार्मिक व सामाजिक कामाची आपणास गोडी लागेल... आणखी वाचा
तूळ
आठवडा आपणास अनुकूलतेचा आहे. जोखमीच्या कामात आपण यशस्वी व्हाल. कोर्ट - कचेरीच्या कामातून सुद्धा लाभ होऊ शकेल. ह्या दरम्यान आपल्यावर कामाची मोठी जवाबदारी टाकली जाऊ शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्या कामगिरीने खुश होतील. ट्रान्सपोर्ट, टुरिझम, कॉम्युनिकेशन, पब्लिकेशन इत्यादी व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना ह्या आठवड्यात फायदा होऊ शकतो. आठवड्यात एखाद्या नवीन व्यवसायाचा सुद्धा आपण विचार करू शकाल. दलाली किंवा कमिशनच्या कामातून आपणास फायदा होईल... आणखी वाचा
वृश्चिक
आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ह्या दरम्यान आपण नवीन कामाची सुरवात करू शकाल. व्यावसायिक कारणाने एखादा प्रवास करावा लागेल. एखादे काम पूर्ण आत्मविश्वासाने केल्यास आपण त्यात यशस्वी होऊ शकाल. पित्याकडून काही लाभ संभवतो. जमीन - जुमल्याच्या कामात आपणास सावध राहावे लागेल. संततीसाठी सुद्धा खर्च करावा लागेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी उत्तम असून त्यांना विद्याभ्यासात यशस्वी होता येईल... आणखी वाचा
धनु
आठवडा आपणास मिश्र फले देणारा आहे. आपणास आर्थिक लाभ होतील. विरोधकांवर मात करू शकाल. ह्या दरम्यान महिला आभूषणांची खरेदी करू शकतील. मात्र वाहन, संपत्ती इत्यादींशी संबंधित कागदपत्र सांभाळून ठेवावी लागतील. कुटुंबात माता किंवा एखाद्या वडीलधारी व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने तातडीचे औषधोपचार करण्यात अधिक पैसा खर्च करावा लागेल. हा आठवडा विद्यार्थ्यांना मध्यम फलदायी आहे... आणखी वाचा
मकर
आठवडा आपणास प्रतिकूलतेचा आहे. त्यामुळे आपणास सावध राहावे लागेल. कोणतेही काम पूर्ण न झाल्याने आपणास नैराश्य येण्याची शक्यता आहे. आपणास नशिबाची साथ मिळत नसल्याची भावना होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्या कामगिरीवर नाखूष होतील. प्राप्तीपेक्षा खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक चणचण जाणवेल. मात्र, आठवड्याच्या मध्यास एखादे काम झाल्याने आपण आनंदित व्हाल. नोकरी करणाऱ्यांना उत्तरार्धात अनुकूलता जाणवेल. आर्थिक लाभासाठी त्यांना अतिरिक्त प्रवास करावा लागेल... आणखी वाचा
कुंभ
आठवडा मिश्र फलदायी आहे. आर्थिक देवाण - घेवाण करताना आपणास सावध राहावे लागेल, अन्यथा आपले मोठे नुकसान होऊ शकते. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. सरकारी कामाशी संबंधित कागदपत्रे जपून ठेवा. आठवड्याच्या मध्यास आपण एखादे नवीन काम सुरु करू शकाल. एखाद्या अनावश्यक खर्चामुळे त्रास होऊ शकतो. उत्तरार्धात नोकरी - व्यवसायात थोडा त्रास संभवतो. आपली विधायकता चांगली असली तरी निर्णय घेण्यात अडचणी येतील... आणखी वाचा
मीन
आठवडा आपणास अंशतः चांगला जाईल. दैनंदिन कामे आपण वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न कराल. ह्या दरम्यान आपल्यातील विधायकता दिसून येईल. उत्तरार्धात प्रिय व्यक्तीचा सुखद सहवास घडेल. हा आठवडा व्यापारी वर्गासाठी उत्तम आहे. विद्यार्थ्यांसाठी मात्र हा आठवडा काहीसा त्रासदायक आहे. ह्या आठवड्यात वडिलांकडून काही लाभ संभवतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मातेच्या आशीर्वादाने आपणास घरातील सर्वांचे प्रेम मिळू शकेल... आणखी वाचा