आठवड्याचे राशीभविष्य - 20 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2020, 'या' राशींसाठी आठवडा असणार 'खास'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 10:08 AM2020-09-20T10:08:21+5:302020-09-20T10:11:05+5:30

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

weekly horoscope 20 september to 26 september 2020 | आठवड्याचे राशीभविष्य - 20 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2020, 'या' राशींसाठी आठवडा असणार 'खास'

आठवड्याचे राशीभविष्य - 20 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2020, 'या' राशींसाठी आठवडा असणार 'खास'

Next

मेष 

 

व्यावसायिक भागीदारी किंवा नोकरीच्या ठिकाणी सांघिक कार्याशी संबंधित कामे करण्यासाठी आठवड्याचे सुरुवातीचे व अखेरचे दिवस अनुकूल आहेत. मधल्या दिवसात शक्यतो महत्वाचे निर्णय घेऊ नये. सध्या आपणास रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आपल्या शक्तीचा वापर योग्य दिशेने केल्यास चांगला फायदा होऊ शकेल. आर्थिक बाबींसाठी हा आठवडा अनुकूल असून नशिबाची सुद्धा साथ मिळेल. असे असले तरी मधल्या दिवसात खर्चात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. सर्जनात्मक बाबी व उच्च शिक्षण ह्यासाठी आठवड्याचा उत्तरार्ध अनुकूल आहे. आपणास नवीन माहिती व ज्ञान प्राप्त करण्यात सहाध्यायींची मदत होईल. उच्च शिक्षणात आपली सक्रियता वाढेल. आठवड्याच्या सुरवातीस संबंधातील समस्या दूर करण्यात आपण यशस्वी व्हाल. आपल्या प्रियव्यक्तीशी संबंधातील सलोखा वाढवण्यात आपणास यश मिळेल. आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात अधिक वेळ घालविल्याने दोघातील जवळीक वाढण्याची दाट शक्यता आहे. आठवड्याच्या मधल्या दिवसात आरोग्यास त्रास संभवतो. विशेषतः ऋतुजन्य आजार होण्याची शक्यता आहे. आवश्यकतेनुसार आरोग्य तपासणी करून घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कंबरदुखी होण्याची शक्यता अधिक आहे.

वृषभ 

आठवड्याच्या सुरुवातीस कामाच्या ठिकाणी आपण अधिक सक्रिय होत असल्याचे दिसून येईल. शेअर्स बाजार, वायदा बाजार किंवा आर्थिक बाजारात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा हा आठवडा उत्तम आहे. नोकरीत आपल्या कामगिरीची प्रशंसा होऊ शकेल. भागीदारी कार्यासाठी आठवड्याचे मधले दिवस अनुकूल आहेत. उत्तरार्धात शक्यतो नवीन कार्य करण्याचे टाळावे. आठवड्याच्या सुरवातीस आर्थिक दृष्ट्या अनुकूलता असल्याचे जाणवेल. नवीन साहस करण्यात आपण यशस्वी होण्याची शक्यता अधिक आहे. जे विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण प्रवेश किंवा अन्य एखाद्या शिक्षण प्रवेश परीक्षेची तयारी करत असतील त्यांच्यासाठी आठवड्याचा पूर्वार्ध अनुकूल आहे. आपली आध्यात्मिक व गूढ विषयांची गोडी वाढल्याने त्यात ज्ञान मिळविण्यासाठी आपण सक्रिय व्हाल. प्रणयी जीवनात आपणास थोडी काळजी घ्यावी लागेल. संबंध टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा आपणास अधिक प्रयत्नशील राहावे लागेल. बहुतांशी आपले मन व्याकुळ राहिल्याने आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागेल. नकारात्मक विचारांमुळे शरीर व मनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. हाडांचे विकार असलेल्या व्यक्तींना सुद्धा काळजी घ्यावी लागेल. अचानक एखादी दुखापत होण्याची संभावना आहे.

मिथुन 

आठवड्यापासून आपल्या प्रियव्यक्तीशी किंवा भागीदाराशी असलेल्या संबंधात मोठे बदल होण्यास सुरवात होईल. त्यांच्याशी असलेला तणाव किंवा मतभेद ह्यात सकारात्मक सुधारणा होत असल्याचे दिसून येईल. आपल्यासाठी हि दिलासाजनक बातमी आहे. ह्या दरम्यान स्वतः बद्दल अधिक योग्यता निर्माण कराल. आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या गरजा व इच्छा पूर्ण करण्यात आपण यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यात आपण यशस्वी झालात तरी त्यांच्या गुप्त कारवायां बाबतीत सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात हाती आलेली संधी अधिक विचार करण्यात किंवा गाफीलतेमुळे निसटून जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी. अखेरच्या दिवशी सर्व काही विसरून आपल्या मस्तीतच राहिलात तर आनंदात राहू शकाल. आठवड्याच्या सुरवातीस विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी वाढली तरी उत्तरार्धात ती मंदावण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या पूर्वार्धात आपणास विशेषतः कफ, आतड्यांचे विकार, पोटाचे विकार, जिभेवर फोड, संसर्ग, मुरडा किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता आहे.

कर्क 

आठवड्याच्या सुरुवातीस आपण व्यक्तिगत जीवनाकडे अधिक लक्ष देऊन कुटुंबियांसह अधिक वेळ घालवाल. आपण अधिक भावनाशील व्हाल. वैवाहिक जोडीदाराचा व्यवहार सुद्धा सकारात्मक राहील. विवाहेच्छुकांचा योग्य व्यक्तीशी संबंध जुळण्याची शक्यता आहे. संबंधात असणाऱ्या व्यक्ती प्रगतीची अपेक्षा बाळगू शकतात. व्यावसायिक आघाडीवर आपली सर्जनात्मकता उत्तम राहील. कारकिर्दीच्या बाबतीत आपण एखादा मोठा निर्णय घेण्याची सुद्धा शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यास आरोग्याची काळजी घ्यावीच लागेल. आहारात नियमितपणा राखावा. तसेच प्रकृतीस प्रतिकूल असलेला आहार टाळावा. ह्या दरम्यान आपण घाईघाईत अनावश्यक कार्यात आपली शक्ती वाया घालविण्याची शक्यता असल्याने कोणत्याही कार्याचे ठोस आयोजन करूनच पुढील वाटचाल करावी. उत्तरार्धात व्यावसायिक आघाडीवर आपल्या प्रतिष्ठेत वाढ होईल. विद्यार्थ्यांसाठी पूर्वार्ध अनुकूल आहे. सध्या अभ्यासा निमित्त एखाद्या छोट्याशा प्रवासाचे आयोजन सुद्धा करू शकाल.

सिंह 

आठवड्याच्या सुरुवातीस कार्यालयीन किंवा व्यावसायिक कामा निमित्त प्रवास करावा लागू शकतो. वरिष्ठ व सहकाऱ्यांशी संबंध सामान्यच राहतील. सध्या आपल्या वाणीच्या प्रभावाने इतरांना आपले म्हणणे सहजपणे पटवून देऊ शकल्याने आपण आपले काम सुलभतेने करू शकाल. नोकरी करणाऱ्या किंवा फुटकळ काम करणाऱ्या व्यक्तींना आठवड्याच्या अखेरच्या दिवशी कामाचा भार वाढण्याची शक्यता आहे. संबंधात सध्या काही समस्या असल्याचे दिसत नाही. कुटुंबियांसह आपण आनंदात वेळ घालवू शकाल. आठवड्याच्या उत्तरार्धात प्रियव्यक्तीस किंवा वैवाहिक जोडीदारास सुद्धा वेळ देऊ शकाल. संततीशी असलेल्या संबंधात अपेक्षेहून कमी फळ मिळण्याची शक्यता आहे. कदाचित मुले आपले म्हणणे ऐकत नसल्याच्या तक्रारीत वाढ होऊ शकते. आपणास आर्थिक चणचणीस सामोरे जावे लागू नये म्हणून हौसमौज किंवा वैभवी जीवनशैलीसाठी अतिरिक्त खर्च करणे टाळावे. वसुलीची कामे होण्याची शक्यता आहे. उत्तरार्धात विद्यार्थ्यांची अभ्यासातील एकाग्रता वाढू शकेल.

कन्या 

आठवड्याच्या सुरुवातीस प्राप्तीत वाढ करण्यावर आपण लक्ष केंद्रित कराल. एखाद्या व्यक्तीकडून वसुली किंवा कर्ज सदृश्य माध्यमातून प्राप्ती होणार असल्यास हाती पैसा आल्यावर आपण त्याचे उत्तम नियोजन करू शकाल. परोपकाराच्या उद्देशाने केलेल्या कामामुळे आपले मन प्रसन्न होईल. मानसिक स्थैर्यामुळे एखादा महत्वाचा निर्णय सहजपणे घेऊ शकाल. वरिष्ठांशी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करू शकाल. आपल्या एखाद्या कार्यास किंवा प्रकल्पास शासकीय लाभ मिळण्याची शक्यता आहे. कार्यालयीन कामा निमित्त प्रवास संभवतो. पैतृक संपत्ती पासून मिळणाऱ्या लाभात सुद्धा सुलभता जाणवेल. उत्तरार्धात कामात अपेक्षित यश प्राप्त होईल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहिल्याने आपण शरीराने व मनाने प्रसन्न राहाल. आपणास मातुला कडून काही आर्थिक लाभ होण्याची किंवा चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी भावी अभ्यासाचे नियोजन करू शकतील. आठवड्याच्या उत्तरार्धात सर्दी, कफ, ताप किंवा ऋतुजन्य विकार होण्याची शक्यता आहे. अखेरच्या दिवशी त्यात सुधारणा होऊ शकेल.

तूळ 

आठवड्याच्या सुरुवातीस आपल्या यशात आपले कौशल्य व वाणीतील मधुरता ह्यांची प्रमुख भूमिका असेल. कुटुंबियांच्या विशेषतः संततीच्या अभ्यासाची व आरोग्याची काळजी दूर झाल्याने त्यांच्यासाठी काही नवीन करण्याचा विचार आपण कराल. ह्या आठवड्यात कायदेशीर बाबींसाठी आपला खर्च होण्याची शक्यता आहे. वडिलधाऱ्यांसाठी खर्च होण्याची किंवा त्यांच्याकडून मिळणाऱ्या लाभात विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरवातीस आपण स्वतःसाठी सुद्धा खर्च कराल. आपण कोणतेही कार्य दृढ मनोबलाने व आत्मविश्वासाने करून त्यात यशस्वी व्हाल. आठवड्याच्या मध्यास वसुलीसाठी प्रयत्न केल्यास त्यात यशस्वी होऊ शकाल. नवीन निधी उभारण्यासाठी आपणास गंभीरतेने विचार करावा लागेल. तसे केल्यास आपले आर्थिक भविष्य सुरक्षित होऊ शकेल व आपल्या आप्तांसाठी सुद्धा आपण काही करू शकाल. असे करून कुटुंबात व समाजात आपल्या प्रतिष्ठेत वाढ होऊ शकेल. उत्तरार्धात प्रवासा दरम्यान आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी टिकून राहील.

वृश्चिक 

आठवड्याच्या सुरुवातीस विवाहेच्छुकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येतील. स्त्री मित्रांकडून आपणास विशेष लाभ होईल. वैवाहिक जीवनातील माधुर्य उपभोगू शकाल. पहिल्या दिवसाच्या सकाळी आपले मन चंचल होईल किंवा आपणास कंटाळा येईल. परंतु लगेचच ह्या स्थितीतून आपण बाहेर पडून नवीन जोमाने ह्या आठवड्याचे स्वागत करण्यास सज्ज व्हाल. नशिबाची साथ मिळाल्याने प्राप्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. आपणास मित्रांद्वारा लाभ होईल. भविष्यात उपयोगी ठरतील अशा नवीन लोकांशी मैत्री होईल. शेअर्स - सट्टा सदृश्य प्रवृत्तीत अल्पकालीन लाभ होईल. परंतु अति लोभाने डोळेझांक साहस करण्या पासून दूर राहावे. कामा निमित्त प्रवासाचे आयोजन करावे लागेल. आठवड्याच्या मध्यास व्यावसायिक बाबींकडे आपण अधिक लक्ष देऊ शकाल. लोक आपल्या कार्याची व यशाची चर्चा करतील. विशेषतः छपाई, रसायने, रंग, औषधे, सरकारी कार्ये, कायद्याशी संबंधित कार्ये ह्यात आपण उत्तम प्रगती साधू शकाल. व्यावसायिक क्षेत्रात आपल्या प्रतिष्ठेत वृद्धी होईल. उत्तरार्धात एखादा चांगला लाभ मिळण्याची अपेक्षा आपण बाळगू शकता. प्रणयी जीवनासाठी सुद्धा उत्तरार्ध अनुकूल आहे. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे.

धनु 

आठवड्याच्या पहिल्या दिवशी व दुसऱ्या दिवसाच्या दुपार पर्यंत कौटुंबिक जीवनात सुख व समाधान जाणवेल. सामाजिक बाबतीत आपणास एखादे यश मिळाल्याने मान - प्रतिष्ठेत वाढ होईल. मागील काही दिवसांपासून व्यावसायिक आघाडीवर आपली प्रगती झाल्याने आपल्या मान - प्रतिष्ठेत वाढ होण्याची अपेक्षा आपण बाळगू शकता. सुरवातीचे दोन दिवस विवाहेच्छुकांसाठी आशास्पद आहेत. एखाद्या योग्य व्यक्तीची भेट संभवते. जे आधीपासूनच संबंधात असतील त्यांना जोडीदारा संबंधी एखादी काळजी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यास आपल्या सहवासाची व प्रेमाची आवश्यकता भासेल. शासन व वडिलांकडून लाभ होईल. उत्तरार्धात नोकरी - व्यवसायातील उच्च पदस्थांच्या प्रोत्साहनामुळे आपला उत्साह द्विगुणित होईल. नोकरी - व्यवसायात आपले वर्चस्व गाजवाल. मात्र, आठवड्याच्या मधल्या दिवसात काळजी घ्यावी लागेल. मनात काही गोंधळ निर्माण झाल्याने महत्वाचे निर्णय सध्या टाळावेत. आर्थिक बाबीत किंवा देवाण - घेवाणीत सावध राहावे. आटवड्याच्या तिसऱ्या व चौथ्या दिवशी आरोग्याची काळजी घ्यावी.

मकर 

आठवड्याच्या पूर्वार्धात व्यावसायिक आघाडीवर आर्थिक लाभ संभवतो. कार्यालयीन वातावरण सहकार्याचे असल्याने आपणास मानसिक दिलासा मिळेल. अपूर्ण कामे पूर्ण करू शकाल. कामा निमित्त दूरवरच्या प्रवासाचे आयोजन होऊ शकेल. जर बाजारात नवीन उत्पादन किंवा सेवा सुरु करावयाची असेल तर त्यासाठी सुद्धा हा आठवडा अनुकूल आहे. आठवड्याच्या मध्यास आपण संबंधात अधिक व्यस्त राहाल. घरात धार्मिक किंवा मंगल प्रसंगाचे आयोजन करण्यासाठी सुद्धा हा आठवडा अनुकूल आहे. संततीच्या बाबतीत प्रगती होताना दिसून येईल. प्रणयी जीवनातील जवळीक अनुभवू शकाल. उत्तरार्धात मोठे निर्णय न घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मानहानी किंवा धनहानी होण्याच्या शक्यतेमुळे कोणावरही डोळेझांक विश्वास ठेवू नये. अखेरच्या दिवशी ग्रह परिवर्तन होऊन आपणास आर्थिक, मानसिक व शारीरिक अशा विविध प्रकारे दिलासा मिळेल. विद्यार्थ्यांसाठी सुरवातीचे दिवस अनुकूल आहेत. ह्या आठवड्यात आपण कुटुंबियांच्या खुशीसाठी किंवा धार्मिक कार्यासाठी खर्च करण्याची शक्यता आहे. उत्तरार्धात छातीत जळजळ, पित्त प्रकोप किंवा नेत्र विकार होण्याची शक्यता आहे.

कुंभ 

आठवड्याच्या सुरुवातीस आपण पूर्वीच्या समस्या किंवा विघ्नातून बाहेर पडून नवीन विचार व नवीन जोमाने पुढे जाण्याची वृत्ती बाळगाल. परदेशस्थ व्यापारी संबंधातून आपणास चांगली बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी आपणास अनुकूल वातावरणात वाढ होईल. नोकरीत पदोन्नती किंवा बक्षिसाच्या रूपात लाभ होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांची सुद्धा व्यापारात चांगली प्रगती होईल. साहित्य, लेखन, माध्यमे, सरकारी कार्ये, कायद्याशी संबंधित कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनी कामात थोडे सतर्क राहावे. संततीच्या लहान - सहान बाबींसाठी आपणास अधिक वेळ द्यावा लागणार असल्याने व्यावसायिक व्यस्ततेतून सुद्धा त्यांच्यासाठी वेळ काढण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आपण देवदर्शासाठी जाऊ शकाल. सेवा कार्यात खर्च कराल. उत्तरार्धात संबंधांच्या बाबतीत आपली संवेदनशीलता वाढल्याने डोक्या ऐवजी हृदयाचे म्हणणे ऐकावे. प्रियव्यक्तीच्या बाबतीत आपण सतत विचारणा व काळजी कराल. नवीन संबंध जुळवताना काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती साधण्याची इच्छा होईल, परंतु त्यासाठी अधिक वेळ अभ्यास करावा लागेल. ह्या आठवड्यात विशेषतः कंबरदुखी, स्नायूंशी संबंधित समस्या किंवा गुप्तांगात एखादी समस्या उदभवण्याची शक्यता आहे.

मीन 

आठवड्याच्या सुरवातीस आपण आपली ऊर्जा व विचारांना मर्यादित ठेवाल. तसेच कोणत्याही कामात किंवा संबंधात अधिक लक्ष देण्या ऐवजी स्वतःच्या मर्यादित जगात वावरण्यास प्राधान्य द्याल. आत्मचिंतनासाठी पहिला दिवस अनुकूल आहे. आपली आध्यात्मिक व परोपकाराची भावना सुद्धा वाढेल. मात्र, दुसऱ्या दिवसाच्या दुपार पासून आपल्यात नवीन ऊर्जा व नवीन विचार येतील जे व्यावसायिक आघाडीवर आपणास नवीन उंची गाठण्यास समर्थ असतील. दूरवरच्या ठिकाणी संपर्क साधून आपणास फायदा होईल. भावंडांशी आपले संबंध चांगले राहतील. त्यांच्याशी सलोखा राहील. कुटुंबियांच्या सहवासात वेळ चांगला घालवू शकाल. व्यापारासाठी योग्य नियोजन करू शकाल. व्यापारा निमित्त बाहेरगावी जाऊन त्यात यशस्वी सुद्धा होऊ शकाल. नोकरीत वरिष्ठ आपली चिकाटी व निष्ठा बघून खुश होतील. नोकरीत पदोन्नती संभवते. असे असले तरी सुद्धा आपण प्रणयी संबंध किंवा वैवाहिक जीवनासाठी वेळ काढू शकाल. आपल्यात उत्तम समन्वय राहील. विद्यार्थ्यांना शिक्षणा संबंधी एखाद्याशी महत्वाची चर्चा करणे शक्य होईल. अभ्यासाचे उत्तम नियोजन करता येईल. पहिल्या दिवशी उगाचच ताण येऊन अनिद्रेचा किंवा मानसिक बेचैनीचा त्रास होऊ शकतो. असे असले तरी उर्वरित दिवसात आपले आरोग्य उत्तम राहील.

Web Title: weekly horoscope 20 september to 26 september 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.