आठवड्याचे राशीभविष्य - 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2018

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 09:14 AM2018-12-24T09:14:44+5:302018-12-24T09:15:47+5:30

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

weekly horoscope 23 December to 29 December 2018 | आठवड्याचे राशीभविष्य - 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2018

आठवड्याचे राशीभविष्य - 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2018

Next

मेष

दि.२३,२४ दरम्यान आपण आपले संबंध दृढ करण्याचा प्रयत्न कराल. आपल्यात आत्मविश्वास व मनाची दृढता दिसून येईल. दागिन्यांची खरेही कराल. अचानक लाभ होणे संभवतो. आपल्या कष्टाचे चीज होईल... आणखी वाचा 

वृषभ

आठवड्याच्या सुरुवातीस दि.२३ रोजी मंगळ आपल्या लाभस्थानातून भ्रमण करू लागेल, तेव्हा पती किंवा पत्नी ह्यांच्या नोकरीत बदल घडू शकतो. कौटुंबिक जीवनात क्लेशदायी वातावरण राहील. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे... आणखी वाचा

मिथुन

आठवड्याच्या सुरवातीस दि.२३ व २४ च्या दुपार पर्यंत आपण यशस्वी व्हाल, व आजवर केलेल्या कष्टाची गोड फळे चाखाल. आपली मान - प्रतिष्ठा वाढेल. हळू हळू आपली मानसिक चिंता दूर होईल. सामाजिक कारणांसाठी आपणास बाहेरगावी जावे लागण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

कर्क 

आठवड्याच्या सुरुवातीस आपला मानसिक गोंधळ वाढेल. अनिद्रेचा त्रास सुद्धा आपणास सतावू शकतो. दि.२३ व २४ च्या दुपार पर्यंत दिवस प्रतिकूल आहेत. आपणास कुटुंबियांचे सहकार्य लाभणार नाही. नोकरीत आपले ध्येय आपण पूर्ण करू शकणार नाही... आणखी वाचा

सिंह

दि.२३ पासून मंगळ आपल्या अष्टमातून भ्रमण करेल, त्यामुळे आपणास प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. विशेषतः रक्तस्त्राव, मुतखडा, रक्ताभिसरण ह्यांचा पुन्हा त्रास होण्याची शक्यता आहे. आपणास विदेशात जावे लागण्याची शक्यता सुद्धा आहे... आणखी वाचा

कन्या

मित्रानो, वर्षाचा हिशोब केल्यास हा शेवटचा आठवडा असून नवीन वर्ष सुरू होणार असल्याने हे दिवस परिवर्तन घडवून आणणारे ठरू शकतील. ह्या दिवसात आपण उत्सवी मूडमध्ये अधिक मग्न व्हाल... आणखी वाचा

तूळ

दि.२३ व २४ दरम्यान जुन्या समस्यांचे निराकरण करण्यात व्यस्त राहाल. आध्यात्मिक चिंतन कराल. कामातील व्यस्ततेमुळे आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. प्राप्तीचे स्रोत वाढतील. मात्र, खर्चात सुद्धा वाढ होईल... आणखी वाचा

वृश्चिक

दि.२३ पासून मंगळ आपल्या पंचमातून भ्रमण करेल त्यामुळे प्रेम प्रकरणात अपयशी व्हाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक मेहनत करावी लागेल. अभ्यासात मागे राहात असलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या बेफिकिरीमुळे अपयशी व्हावे लागेल... आणखी वाचा

धनु 

दि.२३ व २४ च्या दुपार पर्यंत आपण कामात यशस्वी व्हाल व आजवर केलेल्या कष्टाचे चांगले फळ मिळवू शकाल. कार्यस्थळी आपल्या मान - प्रतिष्ठेत वाढ होईल. आर्थिक स्थिती सुद्धा उंचावल्याने कुटुंबात आपण आदर मिळवाल... आणखी वाचा

मकर

आठवड्याचा पूर्वार्ध प्रेम प्रकरणासाठी उत्तम असल्याचे दिसत आहे. सुरुवातीस कदाचित दिवस मध्यम असतील परंतु नंतर आपल्यातील भिन्नलिंगी आकर्षणात वाढ झाल्याचा अनुभव येईल. संतती संबंधी काही खर्च होण्याची शक्यता सुद्धा आहे... आणखी वाचा

कुंभ 

सुरवातीच्या दोन दिवसात आपल्या मनात प्रेमाची भावना उफाळून येईल. प्रियव्यक्तीची भेट घेण्यासाठी आपण काही ना काही आयोजन कराल. विवाहेच्छुक व्यक्ती जोडीदाराचा शोध घेण्यात यशस्वी होतील... आणखी वाचा

मीन 

आठवड्याच्या सुरुवातीस कुटुंबीय व संततीसह आनंद मिळविण्या करता कोठेतरी फिरावयास जाल किंवा कुटुंबियांसह बसून महत्वाच्या विषयांवर चर्चा करू शकाल. नातेवाईक व शेजाऱ्यांशी सौहार्दाचे संबंध राहतील... आणखी वाचा 

 

 

Web Title: weekly horoscope 23 December to 29 December 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.