आठवड्याचे राशीभविष्य - 23 जून ते 29 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 08:28 AM2019-06-24T08:28:10+5:302019-06-24T08:28:28+5:30

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

Weekly horoscope - 23rd June to 29th June 2019 | आठवड्याचे राशीभविष्य - 23 जून ते 29 जून 2019

आठवड्याचे राशीभविष्य - 23 जून ते 29 जून 2019

Next

मेष - ह्या आठवड्यात आपणास थोडे सावध राहण्याची गरज आहे, अन्यथा आपणास त्रास होऊ शकतो. शेअर्स बाजारातून लाभ होईल, मात्र जर एखादी लहानशी चूक झाली तर त्याचा वर्षभर त्रास होण्याची शक्यता असल्याने घाई न करण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे.  आणखी वाचा

वृषभ - हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. ह्या आठवड्यात नोकरी - व्यवसायात आपली व्यस्तता जास्त राहील. असे असले तरी जीवनातील इच्छा व योजना ह्यांच्या प्रति आपण पूर्ण जवाबदारी स्वीकाराल.  आणखी वाचा

मिथुन - हा आठवडा आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. ग्रहांची अनुकूलता लाभल्याने आपण जर प्राप्तीत वाढ करण्याचा प्रयत्न केलात तर निश्चितच आपण त्यात यशस्वी व्हाल. कोणत्याही कामात आपला उत्साह दिसून येईल. आणखी वाचा

कर्क - ह्या आठवड्यात आपण जर थोडे सावध राहिलात तर हा आठवडा आपणास चांगला जाईल. व्यापार - व्यवसायात भागीदारीत यश प्राप्ती होईल. मात्र, ह्या आठवड्यात कामाच्या व्यापामुळे आपण काहीसे तणावग्रस्त व्हाल. घाईघाईत काम केल्याने आपला चिडखोरपणा वाढेल.  आणखी वाचा 

सिंह - हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. मात्र, एखाद्या कामात अपयश आल्याने कामाच्या ठिकाणी आपले मन रमणार नाही, परंतु ह्या नंतरचे दिवस चांगले आहेत. सहकाऱ्यांशी वाद घालू नये. आठवडा अखेरीस कामाच्या ठिकाणी आपला एखादा सन्मान होऊ शकेल. भागीदारीच्या प्रयत्नात यश प्राप्ती होईल. आणखी वाचा

कन्या - हा आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. व्यापारी आपला व्यापार वाढविण्यासाठी एखादे महत्वाचे काम करू शकतील. नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा आठवडा उत्तम आहे. ह्या आठवड्यात एखादी नवीन नोकरी किंवा नवीन प्रकल्प हाती घेऊ शकाल. कोर्ट - कचेरीच्या कामात आपणास त्रास होऊ शकतो. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे. आणखी वाचा

तूळ -  ह्या आठवड्याची सुरवात चांगली झाली तरी, आठवड्याच्या अखेरीस काही त्रास होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा लाभदायी आहे. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. विरोधकांवर मात करू शकाल. मात्र, आठवड्याच्या अखेरीस आपल्या कामाचा व्याप वाढेल. आणखी वाचा

वृश्चिक - हा आठवडा आपल्यासाठी चांगलाच आहे. ह्या दरम्यान आपल्यात नवीन जोम बघावयास मिळेल. आपल्या विचारात नावीन्य असेल व आत्मविश्वास सुध्दा वाढलेला असेल. कार्यस्थळी आपणास नवीन उद्दिष्टे मिळतील. आपण एखाद्या मोठ्या प्रकल्पात सहभागी व्हाल. आणखी वाचा

धनु - हा आठवडा एकंदर आपणास चांगला जाणारा आहे. आपणास नशिबाची साथ मिळेल. व्यापारात यश प्राप्त होईल. आपण आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. हळू हळू आपण आपल्या परिस्थितीत सुधारणा करण्यात यशस्वी व्हाल. जमीन व घर ह्यांचे सौदे करताना काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा

मकर - हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. नोकरी - व्यवसायात आपला सन्मान होईल. नवीन कामाची सुरवात सुद्धा आपल्यासाठी लाभदायी होईल. व्यावसायिक बाबतीत वरिष्ठ व सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. मात्र, ह्या आठवड्यात खर्चात वाढ होत असल्याचे दिसून येईल. आर्थिक बाबतीत कोणत्याही प्रकारचा ताण घेऊ नये. आणखी वाचा

कुंभ - हा आठवडा आपणास लाभदायी आहे. भागीदारीच्या कामातून आपणास लाभ होईल. नोकरीत वरिष्ठांशी संबंधात सौहार्दता राहील. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. सार्वजनिक लाभासाठी कोणत्याही प्रकारच्या अवैध कार्यात अडकू नका. आपणास अनुकूलतेचा लाभ घेण्यासाठी व आपला पुढील मार्ग सुकर करण्यासाठी कष्ट करावे लागतील. आणखी वाचा

मीन - हा आठवडा आपणास त्रासदायी ठरू शकतो. आपल्या कामात विलंब होईल. अनावश्यक खर्चामुळे सुद्धा आपण बेचैन व्हाल. ह्या आठवड्यात कौटुंबिक व आर्थिक निर्णय न घेणे आपल्या हिताचे होईल. विद्यार्थ्यांना सुद्धा हा आठवडा त्रासदायीच आहे. अभ्यासात त्यांचे लक्ष लागणार नाही. विद्यार्थ्यांना अवघड विषयांचे आकलन होण्यात अडचणी येतील. आणखी वाचा
 

Web Title: Weekly horoscope - 23rd June to 29th June 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.