आठवड्याचे राशीभविष्य - 9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 09:48 AM2020-02-10T09:48:57+5:302020-02-10T09:49:39+5:30
कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...
मेष
आठवड्याच्या सुरुवातीस कोणताही आर्थिक निर्णय न घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त खर्चावर सुद्धा नियंत्रण ठेवावे लागेल. हा आठवडा गुंतवणुकीसाठी सुद्धा प्रतिकूल आहे. व्यावसायिक आघाडीवर विलंब व संघर्षमय आठवडा असल्याने इच्छित परिणाम मिळविण्यासाठी दृढ मनोबलासह कष्ट सुद्धा वाढवावे लागतील. शक्यतो कामाच्या ठिकाणी विनाकारण वाद निर्माण होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. आपला सहकारी, भागीदार किंवा वितरक ह्यांच्याशी विनाकारण वाद घालू नका, अन्यथा आपणास त्याचा मानसिक त्रास होईल... आणखी वाचा
वृषभ
आठवड्याच्या सुरुवातीस आपल्या हक्काच्या वस्तूत वाढ करण्यासाठी, नवीन सुरवात करण्यासाठी किंवा कोणतेही धाडस करण्यासाठी अनुकूलता लाभेल. पूर्वार्ध कामाच्या ऐवजी कुटुंबीय किंवा आप्तांसह वेळ घालवण्यास आपण समर्पित कराल. त्यामुळे आपल्या कामावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. देशांतर्गत कार्ये किंवा दूरवरच्या आस्थापनांशी संबंधित कार्ये थोड्या विलंबाने होतील. आपण कुटुंबियांच्या आनंदासाठी किंवा सभोवतालच्या वातावरणात सजावट करण्यासाठी खर्च करण्याची शक्यता नाकारता येत नाही... आणखी वाचा
मिथुन
आठवड्याच्या सुरुवातीस आपणास जे प्रश्न सतावत असतील त्यांचे निराकरण करण्यासाठी योग्य मार्गदर्शकाचा शोध आपण घ्याल. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अडचणी येऊ शकतात, मात्र आठवड्याच्या मध्यास विशेष लक्ष द्यावे लागेल. परंतु, उत्तरार्धात आपण अभ्यासाच्या बाबतीत अधिक गंभीर व्हाल. व्यावसायिक आघाडीवर आपण सुरवातीस नवीन कामाची सुरवात किंवा काही नवीन करण्याचे धाडस करू शकाल. ह्या दरम्यान आपल्या विचारात नावीन्य व सर्जनात्मकता असल्याने व्यावसायिक आघाडीवर उत्तम कामगिरी करू शकाल... आणखी वाचा
कर्क
आठवड्याच्या सुरुवातीस संबंध व संबंधांच्या गरजा ह्या विषयी आपल्या मनात अधिक स्पष्टता असल्याचे दिसून येईल. समविचारी लोकांचा सहवास लाभण्याची सुद्धा शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यास आपणास काही पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे. मात्र काळजी करण्या इतपत परिस्थिती उदभवणार नाही. आहार व विश्रांती ह्यातील नियमितता टिकू शकेल अशा संवयी लावून घेण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. व्यावसायिक आघाडीवर आपणास सकारात्मक परिणाम मिळतील. आठवड्याच्या सुरवातीस प्राप्तीत वाढ होण्यावर आपण लक्ष केंद्रित करून त्यात यशस्वी सुद्धा व्हाल... आणखी वाचा
सिंह
आठवड्याच्या सुरुवातीस मनात खोलवर रुजलेली भीती बाहेर पडेल व एखाद्या असंतोषाच्या भावनेमुळे आपण अधिक संवेदनशील व्हाल. त्यामुळे जोडीदारा संबंधी असलेला गैरसमज दूर करण्याचा व संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करावा. आठवड्याच्या मध्यास वैवाहिक जोडीदार व कुटुंबीय किंवा प्रियव्यक्ती ह्यांच्याशी संबंधात सौहार्दता निर्माण होईल. ह्या आठवड्यात जुनी दुखणी डोके वर काढण्याची किंवा पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा
कन्या
आठवड्याच्या सुरुवातीस व्यावसायिक आघाडीवर व कुटुंबियांशी संवाद साधताना आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. पहिल्या दिवशी दुपार पर्यंत विशेष काही हरकत नसली तरी त्या नंतरच्या दोन दिवसां पर्यंत आपण भावनेच्या भरात कठोरतेने वागून इतरांची मने दुखावण्याची शक्यता आहे. पूर्वार्धात आरोग्याशी संबंधित समस्या, आपल्या मनाच्या एकाग्रतेच्या अभावामुळे मन विव्हळत राहण्याची व कामात निर्णय शक्तीचा अभाव असल्याची समस्या राहील... आणखी वाचा
तूळ
आठवड्याच्या सुरुवातीस व्यावसायिक कारणांसाठी होणारे खर्च किंवा आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या आर्थिक नियोजनाच्या बाबतीत व देवाण - घेवाण करताना सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कुटुंबाशी संबंधीत आपली कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत. व्यावसायिक आघाडीवर आपण प्रगतीस अनुलक्षून पुढे व्हाल व त्यामुळे आपणास नवनवीन मार्ग सुद्धा सापडतील. मात्र, नवीन धाडस करताना कोठेही गाफील राहू नका. नोकरी करणाऱ्यांनी सुद्धा नोकरीत बदल करण्याचा निर्णय विचारपूर्वक करावा... आणखी वाचा
वृश्चिक
आठवड्याच्या पहिल्या दिवशी आपल्यात उत्साह संचारेल व त्यास नशिबाची साथ लाभल्याने सुरवात चांगली होईल. तसे पाहू गेल्यास ह्या आठवड्यात बहुतांश वेळा आपण व्यावसायिक आघाडीवर अधिक लक्ष घालून आपली कारकीर्द व आर्थिक स्थिती अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न कराल. पूर्वार्धात लहान - सहान प्रवास सुद्धा संभवतात. आपण प्रत्येक कार्य दृढ आत्मविश्वास व मनोबलाने करून त्यात यशस्वी व्हाल. प्रकृती चांगली राहिल्याने नोकरी - व्यवसायात लक्ष लागेल. आठवड्याच्या मध्यास नातेवाईक किंवा मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. चिंता कमी झाल्याने स्फूर्ती व उत्साह जाणवेल... आणखी वाचा
धनु
आठवड्याच्या सुरुवातीस आपण अति भावनाशील व्हाल. पहिल्या दिवशी कामाच्या भारामुळे आपणास थकवा जाणवेल. त्या नंतर मात्र प्रत्येक अडचण दूर होऊन आपण एकाग्रचित्ताने कामे करू शकाल. कार्यालयात सहकाराचे वातावरण राहील. दूरवरच्या संपर्कात वाढ होईल व त्याचा कामात फायदा होऊ शकेल. देशांतर्गत कामासाठी सुद्धा आठवड्याचा दुसरा व तिसरा दिवस अधिक आशास्पद असल्याचे दिसत आहे. प्रलंबित कार्ये पूर्ण होतील. आपण कामात नवीन व्यूहरचनेची अंमल बजावणी करू शकाल... आणखी वाचा
मकर
आठवड्याच्या सुरुवातीस कुटुंबियांशी मनमोकळेपणाने चर्चा - विचारणा होऊ शकेल. कार्यालयीन कामा निमित्त बाहेरगावी जावे लागेल. आपण पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे चांगले फळ कारकिर्दीत मिळवू शकाल. नोकरीत पदोन्नती संभवते. विरोधकांवर मात कराल. कारकिर्दीत प्रगती होण्यासाठी नशिबाची साथ मिळेल. मात्र, मशिनरी, रिअल इस्टेट, कृषी, अवजारे, वाहन इत्यादींशी संबंधित कामात निर्णय घेताना काळजी घ्यावी लागेल. शक्यतो वरिष्ठांशी वाद घालू नये व फक्त आवश्यक तितकीच चर्चा करावी... आणखी वाचा
कुंभ
आठवड्याच्या सुरुवातीस प्रतिष्ठित व्यक्तींच्या सहवासात येऊ शकाल. नोकरीत उत्तम कामगिरी होऊ शकेल. आपल्या कामगिरीने इतर व्यक्ती प्रभावित होतील. मात्र, वरिष्ठ किंवा वजनदार व्यक्तीं बरोबर काम करताना विचारपूर्वक मार्गक्रमण करावे, अन्यथा आपल्या एखाद्या वक्तव्याने त्यांच्याशी तणाव निर्माण होऊ शकतो. हेच घर व कुटुंबासाठी सुद्धा लागू आहे. पैतृक संपत्तीतून होणाऱ्या प्राप्तीपेक्षा खर्चाचे प्रमाण वाढते राहील. कायदेशीर खर्च संभवतात. व्यापार - व्यवसायाच्या विकासासाठी आपण उत्तम नियोजन करू शकाल... आणखी वाचा
मीन
आठवड्यात व्यावसायिक आघाडीवर आपण दृढ मनोबल व आत्मविश्वासाने प्रत्येक कार्य सहजपणे पूर्ण करू शकाल. नोकरी - व्यवसाय क्षेत्रात लोक आपली प्रशंसा करतील. नोकरी करणाऱ्यांना पूर्वार्धात प्रगतीचे मार्ग तयार करण्याची योग्य संधी मिळू शकते. भागीदारी कार्ये किंवा संयुक्त धाडसात पुढील वाटचाल करण्यास आठवड्याच्या मध्यास चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसात कोणताही निर्णय घेण्या बाबतीत आपला गैरसमज होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा