चिपळूण आगाराला १ कोटीचा फटका

By Admin | Published: October 26, 2014 09:26 PM2014-10-26T21:26:02+5:302014-10-26T23:28:46+5:30

एस. टी. : खासगी वाहतूक बेलगाम

1 crore rupees to Chiplun Pratara | चिपळूण आगाराला १ कोटीचा फटका

चिपळूण आगाराला १ कोटीचा फटका

googlenewsNext

अडरे : दोनशे मीटर अंतराच्या आत खासगी वाहतुकीला बंदी असली तरीही या मीटरच्या आतच खासगी प्रवासी वाहतूक होत असल्याने याचा फटका चिपळूण एस. टी. आगाराला बसला आहे. गेल्या महिनाभरात एस. टी.ला १ कोटी ४९ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. चिपळूण तालुक्यातील विविध भागात वडापच्या किमान ५०० गाड्या धावतात. यामध्ये लांबपल्ल्याच्या रत्नागिरी गाड्यांचाही समावेश आहे. खासगी वाहतुकीवर उपाय म्हणून सावर्डे, गुहागर व पोफळी मार्गावर मिडीबस सेवाही सुरु करण्यात आली होती. तरीही प्रवाशी मात्र खासगी वाहतुकीला अधिक पसंती देत असल्याचे चित्र दिसत आहे. एस. टी. बसस्थानक आवारामध्ये फलक लावण्यात आला असून २०० अंतराच्या आत खासगी वाहतूक करण्यास मनाई आहे असे असतानाही या परिसरातूनच खासगी प्रवाशी वाहतूक होत आहे. विशेष म्हणजे एस.टी.च्या अधिकाऱ्यांना याबाबत जाणीव होऊनही ते सोयिस्करपणे दुर्लक्ष करत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधित यंत्रणेने पोलीस ठाण्यातही तक्रार करुन दखल घेतली जात नसल्याने ग्रामीण भागात धावणारी एस. टी. आता तोट्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यातील एस. टी.च्या उत्पन्नात १ कोटी ४९ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. खासगी वाहनांना एकप्रकारे प्रोत्साहनच मिळत असल्याने हा तोटा वाढतच जाण्याची शक्यता आहे. प्रवाशी वाढवा अभियानाअंतर्गत एस. टी. प्रवाशी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी प्रयत्नाना पाहिजे तसे यश मिळत नसल्याने ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजली जाणारी एस. टी. बस धावणार अथवा कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)

खासगी प्रवासी वाहतुकीचा परिणाम.
२०० मीटर अंतराच्या आत होतेय खासगी वाहतूक.
खासगी वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आता अधिकाऱ्यांचाच पुढाकार?
ग्रामीण भागाची जीवनवाहिनी तोट्यात.
सप्टेंबरमध्ये एस. टी.ला दीड लाखांचा तोटा.

Web Title: 1 crore rupees to Chiplun Pratara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.