रत्नागिरी जिल्हा रुग्णालयासाठी १० कोटीचा निधी मंजूर : मंत्री रवींद्र चव्हाण

By अरुण आडिवरेकर | Published: August 27, 2022 11:28 AM2022-08-27T11:28:43+5:302022-08-27T11:29:31+5:30

मुंबई - गाेवा महामार्गाच्या पाहणीसाठी मंत्री रवींद्र चव्हाण दाेन दिवस जिल्हा दाैऱ्यावर

10 crore fund approved for Ratnagiri District Hospital says Minister Ravindra Chavan | रत्नागिरी जिल्हा रुग्णालयासाठी १० कोटीचा निधी मंजूर : मंत्री रवींद्र चव्हाण

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयासाठी १० कोटीचा निधी मंजूर : मंत्री रवींद्र चव्हाण

Next

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयातील सुविधांची पाहणी केल्यानंतर रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती हाेणे गरजेचे आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात १० काेटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज, शनिवारी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बाेलताना दिली.

मुंबई - गाेवा महामार्गाच्या पाहणीसाठी मंत्री रवींद्र चव्हाण दाेन दिवस जिल्हा दाैऱ्यावर आले आहेत. त्यांनी शनिवारी सकाळी रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बाेलत हाेते. यावेळी त्यांच्यासाेबत जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन उपस्थित हाेते.

मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व रुग्ण उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात येतात. त्यात ग्रामीण भागातील रुग्ण माेठ्या प्रमाणात असतात. रुग्णालयातील डाॅक्टर त्यांना चांगली सेवा देण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. परंतु, या रुग्णालयाची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. पण हे सगळ खर्चिक असल्याने त्याकडे थाेडेसे दुर्लक्ष हाेत आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता पहिल्या टप्प्यात १० काेटी खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले. त्याला मंजुरी दिल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

डाॅक्टर, प्रमुख मंडळी यांच्याशी चर्चा करुन तातडीने या सर्व गाेष्टी कशा पूर्ण करता येतील यासाठी आपण सर्वजण मिळून काम करु. रुग्णालयातील व्यवस्था सुधारल्या पाहिजेत. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा नियाेजनातूनही यासाठी काही करता येऊ शकते का, याचीही मी माहिती घेणार आहे. सार्वजनिक आराेग्याच्या सर्व व्यवस्था येणाऱ्या काळात अद्ययावत असल्या पाहिजेत. जेणे करुन गाेरगरीब जनतेच्या समस्या सुटल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

Web Title: 10 crore fund approved for Ratnagiri District Hospital says Minister Ravindra Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.