सावर्डेत १० लाखाचा गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 01:53 PM2019-03-14T13:53:17+5:302019-03-14T13:55:23+5:30
चिपळूण तालुक्यातील सावर्डे बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या गोडावूनवर छापा टाकून १० लाख २७ हजार ६४० रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा व औषध प्रशासन या विभागाने दि.१२ रोजी दुपारी २.३० वाजता केली. त्यानुसार एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिपळूण : तालुक्यातील सावर्डे बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या गोडावूनवर छापा टाकून १० लाख २७ हजार ६४० रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा व औषध प्रशासन या विभागाने दि.१२ रोजी दुपारी २.३० वाजता केली. त्यानुसार एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्याद प्रशांत प्रभाकर गुंजाळ (रत्नागिरी) यांनी दिल्यानुसार सावर्डे बाजारपेठेत विक्रीसाठी साठा केल्याने जितेंद्र मनोहर कोकाटे (रा.सावर्डे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षा आयुक्त यांच्या प्रतिबंधित आदेशानुसार हा गुटखा कोणाकडून खरेदी केला याची माहिती दिली नाही.
घराशेजारील गोडावूनमध्ये छापा टाकून गुटखा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये विमल पान मसाला ६०० पॅकेट असून त्याची किंमत ८४ हजार, महेफ सिल्व्हर पान मसाला १५४ पॅकेट असून १५ हजार ६०० रुपये, एम ०१ जर्दा याची २४ पॅकेट असून ९६० रुपये, गोवा गुटखा याची २ हजार ७८४ पॅकेट असून त्याची किंमत ३ लाख ३४ हजार ८० रुपये, जॉय पान मसाल्याची ८७२ पॅकेट असून ८७ हजार ७०० रुपये, गोवा प्रिमियम ४९२ पॅकेट असून ८८ हजार ५६० रुपये, गोवा गुटखा याची १६५ पॅकेट असून ३९ हजार रुपये, राज कोल्हापूर याची ४१० पॅकेट असून १ लाख २३ हजार ४०० रुपये, थ्री एक्स जर्दा याची १ हजार ४४० पॅकेट असून १ हजार ४९० रुपये, सुलतान जर्दा याची ९३५ पॅकेट असून ९३ हजार ५०० रुपये, रॉयल चॉईस याची ४९५ पॅकेट असून ४९ हजार ५०० रुपये, सिक्का जर्दा ५५० पॅकेट असून ५५ हजार रुपये, नजर गुटख्याची १५० पॅकेट असून १५ हजार रुपये, आरएमडी गुटख्याचे ८५ बॉक्स असून ३९ हजार रुपये असा एकूण १० लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.