रत्नागिरीत सलग दुसऱ्या दिवशी १० रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:28 AM2021-04-19T04:28:12+5:302021-04-19T04:28:12+5:30
रत्नागिरी : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, २४ तासांत ५५५ रुग्ण आढळल्याने एकूण १५,६३० रुग्ण झाले आहेत; तर सलग दुसऱ्या ...
रत्नागिरी : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, २४ तासांत ५५५ रुग्ण आढळल्याने एकूण १५,६३० रुग्ण झाले आहेत; तर सलग दुसऱ्या दिवशी १० जणांचा काेराेनाने मृत्यू झाला. मृतांची एकूण संख्या ४४९ झाली आहे. २५५ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ११,९१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
प्रशासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आलेले असतानाही कोरोनाबाधितांची संख्या कमी होत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत चालला आहे. आतापर्यंतच कोरोनाबाधितांची आजची ५५५ ही संख्या उच्चांकी ठरली आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आरटीपीसीआर चाचणीतील ३४८ रुग्ण तर ॲन्टिजेन चाचणीतील २०७ रुग्ण आहेत. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यात १६० रुग्ण, चिपळुणात १३१, दापोलीमध्ये २६, खेडमध्ये ७२, गुहागरात ५२, संगमेश्वरमध्ये ६१, मंडणगडात ९, लांजात २४, राजापुरात २० रुग्ण आढळले. पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचा दर १२.५ टक्के, तर बरे होण्याचा दर ७६.१९ टक्के आहे.
कोरोना मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत असून १० रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये संगमेश्वर तालुक्यातील ३, चिपळूण दापोलीतील प्रत्येकी २ आणि रत्नागिरी, राजापूर, खेड येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मृतांमध्ये ४ महिला आणि ६ पुरुष रुग्ण आहेत. मृत्यूचे प्रमाण २.८७ टक्के आहे. गृहविलगीकरणात ११२४ रुग्ण असून वेगवेगळ्या कोविड रुग्णालयांमध्ये २१४५ रुग्ण उपचार घेत आहेत.