दोन दिवसांत १,०१९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:26 AM2021-05-03T04:26:16+5:302021-05-03T04:26:16+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत कोरोनाने २५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या ६८१ झाली आहे, तर ...
रत्नागिरी : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत कोरोनाने २५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या ६८१ झाली आहे, तर पॉझिटिव्ह १,०१९ रुग्ण आढळले असून, बाधित एकूण २३,३०२ रुग्ण झाले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबता थांबत नसल्याने प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे. मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यात १० रुग्ण, लांजात ४, संगमेश्वरमध्ये २, चिपळूण, राजापूरमध्ये प्रत्येकी ३ रुग्ण तर गुहागर आणि खेडमध्ये एका रुग्णाचा समावेश आहे. मृतांचे प्रमाण ६८.६८ टक्के आहे. यामध्ये एका २६ वर्षीय युवकाचाही कोरोनाने मृत्यू झाला आहे. शासकीय रुग्णालयामध्ये २१ रुग्णांचा तर खासगी रुग्णालयांमध्ये ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. खासगी रुग्णातील कोरोना मृत्यूचे प्रमाण कमी आहे.
कोरोनाबाधित रुग्णांमध्ये नेहमीप्रमाणेच रत्नागिरी तालुक्यात सर्वात जास्त ३१४ रुग्ण असून, सर्वात कमी ११ रुग्ण मंडणगड तालुक्यात सापडले आहेत, तर दापोली तालुक्यात ९९ रुग्ण, खेडमध्ये १३८, गुहागरात ८५, चिपळुणात १६९, संगमेश्वरमध्ये ११२ रुग्ण, लांजात ५९ आणि राजापुरात ३२ रुग्ण आढळले आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, ते प्रमाण १५ टक्के आहे. मृतांचे प्रमाण २.८९ टक्के आहे.