रत्नागिरी जिल्ह्यात लेप्टोचे १५ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 05:34 AM2018-08-05T05:34:26+5:302018-08-05T05:34:29+5:30
जिल्ह्यात लेप्टोच्या रुग्णांमध्ये आणखी ४ रुग्णांची भर पडल्याने एकूण संख्या १५ झाली आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यात लेप्टोच्या रुग्णांमध्ये आणखी ४ रुग्णांची भर पडल्याने एकूण संख्या १५ झाली आहे. लेप्टोच्या वाढत्या संख्येत वाढ होत चालल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
पावसाळा सुरु झाल्यापासून जिल्ह्णात लेप्टोचे आतापर्यंत एकूण संशयित ७० रुग्ण आढळून आले होते. त्या सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरु असून रक्त तपासणीनंतर आतापर्यंत १५ जणांना लेप्टो पॉजिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये संगमेश्वर तालुक्यात ६, रत्नागिरी तालुक्यात ७ तर गुहागर आणि राजापूर या तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
यापैकी रुग्ण बरेही झाले आहेत. त्याचबरोबर ज्या परिसरामध्ये लेप्टोचे रुग्ण आढळून आले आहेत, तेथे आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन तपासणी केली आहे.