बचत गटातील १३४ महिलांना सव्वा कोटीचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:24 AM2021-05-29T04:24:33+5:302021-05-29T04:24:33+5:30

रत्नागिरी : उमेद अभियानातील महिला बचत गटांमार्फत अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र शासनाने जिल्ह्यातील १३४ महिलांना १ ...

154 crore sanctioned to 134 women from self help groups | बचत गटातील १३४ महिलांना सव्वा कोटीचा निधी मंजूर

बचत गटातील १३४ महिलांना सव्वा कोटीचा निधी मंजूर

Next

रत्नागिरी : उमेद अभियानातील महिला बचत गटांमार्फत अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र शासनाने जिल्ह्यातील १३४ महिलांना १ कोटी ३७ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक अनुदान रत्नागिरी जिल्ह्याला प्राप्त झाले आहे.

कोरोना कालावधीत अनेक उद्योग उद्ध्वस्त झाले आहेत. काही उद्याेगांना आर्थिक उभारी मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने आत्मनिर्भर भार पॅकेज जाहीर केले. गावागावात अनेक महिला बचत गटांच्या माध्यमातून छोटे-छोटे अन्न प्रक्रिया उद्योग करून त्यावर कुटुंबांची गुजराण होते. यामध्ये पापड, लोणची तयार करणे, गरे तळणे, आंबा व काजू प्रक्रिया उद्योगांचा समावेश आहे. त्यांना उभारी देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा सहभाग असलेल्या प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेतून २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्याचे नियोजन केले आहे.

ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील स्वयंसहाय्यता समूहातील एका सदस्याला ४० हजार रुपये बीज भांडवल देण्यात येणार आहे. गटातील १० सदस्यांना मिळून ४ लाख रुपये मिळणार आहेत. या योजनेच्या लाीासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी उमेद अभियानांतर्गत आवाहन केले होते. जास्तीत जास्त गटातील महिलांनी याचा लाभ घ्यावा, यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एन. बी. घाणेकर यांनी नियोजन केले होते. प्रभाग संघात कार्यरत उमेदच्या अधिकाऱ्यांनीही ही योजना महिलांपर्यंत पोहोचवली. त्यामुळे ४०० महिलांनी ॲानलाईन नोंदणी केली होती. राज्याला पहिल्या टप्प्यात ९ कोटी ४८ लाख रुपये मंजूर झाले असून, रत्नागिरी जिल्ह्याला १ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. याचे वितरण १३४ लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे.

Web Title: 154 crore sanctioned to 134 women from self help groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.