जिल्ह्यात १५७ कोरोनाचे नवे रुग्ण, ९ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:32 AM2021-08-15T04:32:55+5:302021-08-15T04:32:55+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाबाधित १५७ रुग्ण सापडले आहेत. ९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर ९७ रुग्ण ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाबाधित १५७ रुग्ण सापडले आहेत. ९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर ९७ रुग्ण कोराेनातून बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या १,८१७ रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्याभरात ६,१२३ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये आरटीपीसीआर चाचणीतील ५९ आणि ॲन्टिजन चाचणीतील ९८ रुग्ण आहेत. त्यात मंडणगड तालुक्यात ५ रुग्ण, दापोलीत १७, खेडमध्ये १८, गुहागरात १६, चिपळुणात ४७, संगमेश्वरात १०, रत्नागिरीत ३३, लांजात २ आणि राजापुरात ९ रुग्ण सापडले आहेत. बाधितांची एकूण संख्या ७४ हजार झाली आहे. जिल्हाभरात ॲक्टिव्ह रुग्ण १,६७८ आहेत.
जिल्हाभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले नाही. दिवसभरात ८ रुग्ण तर मागील दिवसात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये खेड, गुहागर तालुक्यांमध्ये २ रुग्णांचा तर मंडणगड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. एकूण २,१९५ बाधितांच्या मृत्यू झाला आहे. बाधितांच्या मृत्यूचा दर कमी झाला असून तो २.९७ टक्क्यावर आला आहे. जिल्ह्यात ६९,९८८ बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यांचा बरे होण्याचा दर ९४.५८ टक्के आहे.