चिपळुणात १६ कोटीची कामे होणार सुरु, काहींच्या निविदा, काहींना तांत्रिक मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 03:56 PM2018-10-31T15:56:47+5:302018-10-31T15:58:43+5:30
चिपळूण नगर परिषदेकडून या वर्षात १६ कोटी रुपयांची विकासकामे केली जाणार आहेत. काही कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून काहींना तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. स्वामीमठ ते महाराष्ट्र हायस्कूल रस्त्याचे लवकरच भूमिपूजन होणार आहे. प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागात लाखो रुपयांची कामे होत आहेत.
चिपळूण : नगर परिषदेकडून या वर्षात १६ कोटी रुपयांची विकासकामे केली जाणार आहेत. काही कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून काहींना तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. स्वामीमठ ते महाराष्ट्र हायस्कूल रस्त्याचे लवकरच भूमिपूजन होणार आहे. प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागात लाखो रुपयांची कामे होत आहेत.
गटारे, पाखाड्या, रस्ते डांबरीकरण, संरक्षण भिंती, शाळा दुरुस्ती, आरसीसी नाले, धोबीघाट, रस्ते, बीबीएम, कारपेट सिलकोट करणे, सार्वजनिक शौचालये, कंपाऊंड वॉल बांधणे आदी कामांच्या निविदा प्रक्रिया पार पडल्या आहेत. तर काही कामांना तांत्रिक मंजुरी मिळाली असून काही कामे तांत्रिक मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहेत.
१६ कोटींच्या विकासकामात नगरसेवक करामत मिठागरी, संजीवनी शिगवण यांच्या प्रभागात ५० लाख १० हजार, सीमा रानडे, रसिका देवळेकर यांच्या प्रभागात ६७ लाख १४ हजार, राजेश केळस्कर, फैरोजा मोडक यांच्या प्रभागात ३ लाख ८० हजार, जयश्री चितळे, शशिकांत मोदी यांच्या प्रभागात १८ लाख २९ हजार, बिलाल पालकर, शिवानी पवार यांच्या प्रभागात ३० लाख ३२ हजार, मनोज शिंदे, स्वाती दांडेकर यांच्या प्रभागात ७१ लाख ४५ हजार, सफा गोठे, कबीर काद्री यांच्या प्रभागात ३३ लाख ४९ हजार, सुषमा कासेकर, भगवान बुरटे यांच्या प्रभागात २९ लाख ८६हजार, सुरैय्या फकीर, आशिष खातू यांच्या प्रभागात ४९ लाख १४ हजार, सुधीर शिंदे, वर्षा जागुष्टे यांच्या प्रभागात १३ लाख ५३ हजार, निशिकांत भोजने, नुपूर बाचिम यांच्या प्रभागात १ कोटी ३० लाख, संजीवनी घेवडेकर, उमेश सकपाळ यांच्या प्रभागात ७७ लाख ६३ हजार, सई चव्हाण, मोहन मिरगल यांच्या प्रभागात ७२ लाख ७२ हजार रुपयांची विकासकामे होणार आहे.
या कामांबरोबरच ५ लाख रुपये खर्च करुन विजापूर मार्ग ते खेर्डी पंप हाऊस रस्ता, २ लाख ९६ हजार रुपये खर्च करुन खेर्डी दत्तमंदिराजवळील पाण्याच्या टाकीकडे जाणारा रस्ता व गटार, ५४ लाख ६२ हजार खर्च करुन मच्छी व मटन मार्केटची उर्वरित कामे, ४६ लाख ४० हजारांची भाजी मंडईवर शेड, ५ कोटी ७७ लाखांचे अंतर्गत हॉटमिक्सचे रस्ते केले जाणार आहेत.