HSC/12th Exam: रत्नागिरी जिल्ह्यातून १७ हजार ४८९ विद्यार्थी परीक्षा देणार
By मेहरून नाकाडे | Published: February 20, 2024 06:25 PM2024-02-20T18:25:32+5:302024-02-20T18:26:35+5:30
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) बुधवार दि. ...
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) बुधवार दि. २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील एकूण ३८ परीक्षा केंद्रावर यंत्रणा सज्ज झाली आहे. परीक्षेसाठी जिल्ह्यातून १७ हजार ४८९ विद्यार्थी बसणार आहेत.
विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. सकाळच्या सत्रात १०.३० वाजता तर दुपारच्या सत्रात २.३० वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. परीक्षेसाठी निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आली आहे. प्रवेशपत्राशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे बोर्डातर्फे सूचित करण्यात आले आहे.
परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी सहा भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच परीक्षा कालावधीत सहाय्यक परिरक्षक (रनर) बैठे पथक मुख्य केंद्रावर कार्यरत राहणार आहे. विद्यार्थ्यांनी शांततेत परीक्षा देण्याची सूचना केली आहे.