बँडमन पदासाठी १७०८ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:38 AM2021-09-04T04:38:35+5:302021-09-04T04:38:35+5:30

रत्नागिरी : जिल्हा पाेलीस दलातील बँडमन पदाच्या ३ जागांसाठी शुक्रवारी परीक्षा पार पडली. या पदासाठी आलेल्या ५००५ उमेदवारांपैकी १७०८ ...

1708 students appeared for the Bandman post | बँडमन पदासाठी १७०८ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

बँडमन पदासाठी १७०८ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

Next

रत्नागिरी : जिल्हा पाेलीस दलातील बँडमन पदाच्या ३ जागांसाठी शुक्रवारी परीक्षा पार पडली. या पदासाठी आलेल्या ५००५ उमेदवारांपैकी १७०८ उमेदवारांनी परीक्षा दिली, तर ३२९७ विद्यार्थी अनुपस्थित होते.

परीक्षेदरम्यान कोणत्याही केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाेलीस दलातर्फे बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) शिवाजी पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे आणि अन्य पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी परीक्षा पार पाडण्यासाठी मेहनत घेतली. शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून सर्व केंद्रांवर पोलीस अधिकारी व अंमलदार, व्हिडिओग्राफर तैनात करण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सकाळी ८ वाजल्यापासून प्रवेश पत्राची तपासणी करून वर्गात सोडण्यात येत होते.

Web Title: 1708 students appeared for the Bandman post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.