जिल्ह्यात कोरोनाचे १८ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:31 AM2021-03-18T04:31:48+5:302021-03-18T04:31:48+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह १८ रुग्ण आढळले असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०,२७० झाली आहे. १९ रुग्ण कोरोनामुक्त ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह १८ रुग्ण आढळले असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०,२७० झाली आहे. १९ रुग्ण कोरोनामुक्त एकूण ९,७६६ रुग्ण बरे झालेले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचे संकट जैसे थे असल्याने आरोग्य विभागाकडूनही काळजी घेण्यात येत आहे. मात्र, नागरिकांकडून प्रशासनाला सहकार्य मिळत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. बहुतांश लोक विनामास्क फिरतात, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाहीत. त्यामुळे कोरोनाची संख्या कमी झालेली नसून, त्यात सातत्य आहे. जिल्ह्यात ५३५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५१७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला.
बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर तपासणीतील १५ रुग्ण आणि अँटिजन तपासणीतील ३ रुग्ण आहेत. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील ६ रुग्ण, दापोलीतील ३ रुग्ण, चिपळुणातील ४, मंडणगडमधील १ रुग्ण आणि संगमेश्वर, राजापुरातील प्रत्येकी २ रुग्णांचा समावेश आहे.
दिवसभरात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्याने मृतांची संख्या ३७० जैसे थे असून, मृत्यूचे प्रमाण ३.६० टक्के, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०९ टक्के आहे.