लांजात चक्रीवादळामुळे १९ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:29 AM2021-05-22T04:29:23+5:302021-05-22T04:29:23+5:30

लांजा : तौक्ते चक्रीवादळामुळे लांजा तालुक्यात २०९ घरांचे अंशतः, ३ घरांचे पूर्णतः तसेच जनावरांचे १६ गोठे, सार्वजनिक ३ मालमत्तांचे ...

19 lakh loss due to cyclone in Lanjat | लांजात चक्रीवादळामुळे १९ लाखांचे नुकसान

लांजात चक्रीवादळामुळे १९ लाखांचे नुकसान

googlenewsNext

लांजा : तौक्ते चक्रीवादळामुळे लांजा तालुक्यात २०९ घरांचे अंशतः, ३ घरांचे पूर्णतः तसेच जनावरांचे १६ गोठे, सार्वजनिक ३ मालमत्तांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने आत्तापर्यंत केलेल्या पंचनाम्यात १९ लाख ६४ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, अजूनही पडझड झालेल्या घराचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.

तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा शनिवारी दुपारपासून लांजा तालुक्यात जाणवायला लागला. शनिवारी दुपारी जोरदार हवा व पावसाची रिपरिप सुरु झाली होती. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या दरम्याने जोरदार पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याच्या वाऱ्याने तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. मात्र, कुठेही मनुष्य हानी किंवा या वादळामध्ये जखमी झालेला नाही. तालुक्यात ३ घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. यामध्ये २ घरांचे पंचनामे करण्यात आले असून, २ घरांचे ३ लाख ४५ हजारांचे नुकसान झाले आहे. तसेच अंशतः नुकसान झालेल्या २०९ घरांपैकी १२७ घरांचे पंचनामे करण्यात आले असून, १५ लाख २४ हजारांचे नुकसान झाले आहे, तर ८२ पंचनामे करायचे शिल्लक आहेत. १६ गोठ्यांचे नुकसान झाले असून, ११ गोठ्याचे पंचनामे केले असून, १७ हजाराचे नुकसान झाले आहे, तर ५ गोठ्यांचे पंचनामे करायचे शिल्लक आहेत. आतापर्यंत करण्यात आलेल्या पंचनाम्यात एकूण १९ लाख ६४ हजारांचे नुकसान झाले आहे. गेले पाच दिवस तालुक्यातील ग्रामीण भागात विद्युत पुरवठा ठप्प आहे. तो सुरळीत करण्यात महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना यश न आल्याने रात्रीच्या अंधारात चाचपडत रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजना ठप्प झाल्याने पाणी असूनही पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.

Web Title: 19 lakh loss due to cyclone in Lanjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.