रत्नागिरी जिल्ह्यातील २९९ शाळा बाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 03:55 PM2019-01-14T15:55:54+5:302019-01-14T15:57:32+5:30

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील शालाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभाग कार्यरत आहे. गेल्या तीन वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील २९९ मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यात यश आले आहे.

2 99 schools in Ratnagiri district stream out of foreign students' education stream | रत्नागिरी जिल्ह्यातील २९९ शाळा बाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात

रत्नागिरी जिल्ह्यातील २९९ शाळा बाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात

Next
ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील २९९ शाळा बाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातचिरेखाणीवर कामासाठी येणाऱ्या अन्य राज्यातील कामगाारांचा समावेश

रत्नागिरी : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील शालाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभाग कार्यरत आहे. गेल्या तीन वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील २९९ मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यात यश आले आहे.

बालकांचा मोफत व सक्तिचा शिक्षण हक्क अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. त्यानुसार आरटीई २००९ कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत सुरू आहे.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकही मूल शालाबाह्य राहणार नाही, यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार शिक्षण विभाग कार्यरत आहे. स्थलांतरीत बालकांना शिक्षण देण्यासाठी तसेच शालाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

गेल्या तीन वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील २९९ विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट झाले आहेत. जिल्ह्यात चिरेखाणीवर कामासाठी येणाऱ्या अन्य राज्यातील कामगाारांचा समावेश आहे. याशिवाय रस्त्याच्या कामासाठी देखील अन्य राज्यातील मंडळी येत असल्यामुळे शैक्षणिक प्रवाहात परराज्यातून आलेल्या कामगारांच्या मुलांचा समावेश करण्यात आला असून, त्यासाठी शिक्षण विभागाला यश आले आहे. सन २०१६-१७ मध्ये १५९, सन २०१७-१८ मध्ये ६६, तर सन २०१८-१९ मध्ये ७४ मुले शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट झाली आहेत.

रत्नागिरीमध्ये १३३५ शिक्षकांची बालरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक शाळेला स्वच्छ व सुंदर परिसर उपलब्ध करून देणे, शाळेत लोकसहभाग वाढविण्यावर भर, शिक्षकांची गुणवत्ता व कल्पकतेला वाव, स्वअध्ययनावर भर, कठीण विषयाची आवड निर्माण करणे, शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करणे, शाळा सुंदर, बोलक्या करणे, शाळेविषयी आवड निर्माण करणे, सोप्या पध्दतीने ज्ञानार्जन करून विद्यार्थ्यांच्या संपादणूक क्षमतेत वाढ करणे, सर्वांगिण विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.


शालाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना बालरक्षक म्हणून कार्य करण्याची संधी देण्यात आली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालाबाह्य मुलांसाठी विशेष प्रशिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. शालाबाह्य मुलांना जवळच्या नियमित शाळेत दाखल करून त्यांचे युङ्कआयडी आधार काढण्यात यावेत, त्यांची उपस्थिती या माध्यमातून संनियंत्रित करण्यात यावी.


या मुलांना वाचनङ्कलेखन व गणितातील मूलभूत क्रिया अवगत होण्याकरिता महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने विकसित केलेल्या शैक्षणिक कृती आराखड्याचाच उपयोग करण्यात यावा. यासाठी शिक्षकांनी स्वत:ला अधिक समृद्ध करावे, अशा सूचना देण्यात आल्या असून, त्याची अमंलबजावणी सुरू आहे.

 

Web Title: 2 99 schools in Ratnagiri district stream out of foreign students' education stream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.