कोकण रेल्वे मार्गावर येत्या शुक्रवारी अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’; गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार 

By शोभना कांबळे | Published: May 22, 2024 05:47 PM2024-05-22T17:47:53+5:302024-05-22T18:05:05+5:30

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवार, दि. २४ मे रोजी सावर्डे ते भोकेदरम्यान अडीच तासांचा 'मेगा ब्लॉक' घेण्यात येणार ...

2 hours Mega Block on Konkan railway line next Friday | कोकण रेल्वे मार्गावर येत्या शुक्रवारी अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’; गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार 

कोकण रेल्वे मार्गावर येत्या शुक्रवारी अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’; गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार 

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवार, दि. २४ मे रोजी सावर्डे ते भोकेदरम्यान अडीच तासांचा 'मेगा ब्लॉक' घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकचा लांब पल्ल्याच्या दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

कोकण रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण तालुक्यातील सावर्डे ते रत्नागिरीतील भोकेदरम्यान दि. २४ मे रोजी सकाळी ७ ते ९.३० असा अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळ एर्नाकुलम ते हजरत निझामुद्दीन मंगला एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२६१७) ही २३ रोजी धावणारी सुपरफास्ट गाडी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान १ तास ५० मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.

तसेच २३ मे रोजी तिरुनेलवेली ते गांधीधाम दरम्यान धावणारी गाडी (क्रमांक २०९२३) कोकण रेल्वे मार्गावर दि. २४ रोजी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान १ तास १० मिनिटे थांबवली जाणार आहे.

Web Title: 2 hours Mega Block on Konkan railway line next Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.