लांजात एकाच दिवशी आढळले २० रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 06:10 PM2021-04-07T18:10:38+5:302021-04-07T18:12:07+5:30

CoronaVirus Lanja Ratnagiri : लांजा तालुक्यात सोमवारी एका दिवसामध्ये कोरोनाचे सर्वाधिक तब्बल २० रुग्ण आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. निवसर बौद्धवाडी आणि व्हेळ मोगरगाव येथे संख्या वाढतच आहे.

20 patients were found in Lanza on the same day | लांजात एकाच दिवशी आढळले २० रुग्ण

लांजात एकाच दिवशी आढळले २० रुग्ण

Next
ठळक मुद्देलांजात एकाच दिवशी आढळले २० रुग्ण नागरिकांची चिंता वाढली

लांजा : तालुक्यात सोमवारी एका दिवसामध्ये कोरोनाचे सर्वाधिक तब्बल २० रुग्ण आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. निवसर बौद्धवाडी आणि व्हेळ मोगरगाव येथे संख्या वाढतच आहे.

सोमवारी निवसर बौद्धवाडी येथील आरटीपीसीआर कोरोना अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये ७ वर्षीय मुलगा, ११ व ९ वर्षीय मुली असे एकूण तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. व्हेळ मोगरवाडी येथे कोरोना विस्फोट झाला असून, कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेले तब्बल १२ जणांचे आरटीपीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये ५९ व ५२ वर्षीय प्रौढ पुरुष, ५० व ४० वर्षीय महिला, १३ वर्षीय मुलगा, ६९ व ४१ वर्षीय महिला, १० वर्षीय मुलगा, ७५ वर्षीय प्रौढ पुरुष, २२ वर्षीय तरुणी, २७ वर्षीय महिला, ६५ वर्षीय प्रौढ महिला असे एकूण १२ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

तसेच शहरातील वैभव वसाहत येथील २९ वर्षीय तरुण, प्रभानवल्ली गोसावीवाडी येथील ६५ वर्षीय प्रौढ महिला, पनोरे मोर्येवाडी येथील ४५ वर्षीय महिला, प्रभानवल्ली नांगरफळे येथील ५५ वर्षीय महिला, कोर्ले बौद्धवाडी येथील ६० वर्षीय प्रौढ पुरुष असे तालुक्यात तब्बल २० कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

Web Title: 20 patients were found in Lanza on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.