डबलडेकरला २२ डबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:20 AM2021-07-19T04:20:43+5:302021-07-19T04:20:43+5:30

खेड : गणेशोत्सवात ४ सप्टेंबरपासून लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव डबलडेकर ही साप्ताहिक स्पेशल गाडी १२ डब्यांऐवजी २२ डब्यांची ...

22 coaches to double decker | डबलडेकरला २२ डबे

डबलडेकरला २२ डबे

Next

खेड : गणेशोत्सवात ४ सप्टेंबरपासून लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव डबलडेकर ही साप्ताहिक स्पेशल गाडी १२ डब्यांऐवजी २२ डब्यांची धावणार आहे. कोकण मार्गावर गणेशोत्सवात ४ गणपती स्पेशलच्या ७२ फेऱ्या चालविण्याच्या निर्णय घेतला आहे. दि. ४ ते ११ सप्टेंबर या कालावधीत दर शनिवारी तर परतीच्या प्रवासात ५ ते १२ सप्टेंबरपर्यंत दर रविवारी २२ डब्यांची गाडी धावणार आहे.

डेंग्यूचा रुग्ण

खेड : तालुक्यात एकीकडे कोरोनाचा कहर सुरु असतानाच मुरडे येथे डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. या रुग्णावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पुढे आली आहे. मुरडे येथे आढळलेल्या डेंग्यूसदृश्य रुग्णामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

डीएससीसाठी भरती प्रक्रिया

रत्नागिरी : मराठा रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे ९ ते १० ऑगस्ट २०२१ या कालावधीत माजी सैनिक कोट्यातून डीएससी भरतीसाठी प्रक्रियेचे आयोजन करण्यात येणार आहे. सैनिक जनरल ड्युटी व सोल्जर क्लार्क पदांसाठी भरती आहे. जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी या भरतीसाठी ९ ऑगस्ट रोजी आवश्यक कागदपत्रांसह मराठा रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे उपस्थित राहावे.

बदली रद्द

खेड : खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. किरण पाटील यांची केवळ २० दिवसांतच तडकाफडकी पदावरुन हटवून अन्यत्र बदली करण्यात आली होती. मात्र, अवघ्या एका दिवसातच ही बदली रद्द करुन पुन्हा तालुका वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्तीचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांनी पारित केले आहेत. यामागचे नेमके कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

महिला लोकशाही दिन

रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. माहे जुलै २०२१चा महिला लोकशाही दिन १९ जुलै रोजी सकाळी ११ ते १ यावेळेत आयोजित करण्यात आला आहे. लोकशाही दिनात १०७७ या टोल फ्री क्रमांकावर ११ ते १ यावेळेत त्यांचे निवेदन/अर्ज नोंदवता येतील, असे महिला लोकशाही दिन समिती यांनी कळविले आहे.

शिवसंपर्क अभियान बैठक

खेड: तालुक्यातील धामणंद विभागात शिवसंपर्क अभियानांतर्गत जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी सदस्य व मतदान नोंदणीसह शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी संघटना मजबूत करण्याचे आवाहन कदम यांनी केले.

Web Title: 22 coaches to double decker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.