रेल्वेची धडक बसून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 01:11 PM2020-11-19T13:11:08+5:302020-11-19T13:13:01+5:30
accident, railway, ratnagirinews, konkan, police तुतारी एक्स्प्रेस रेल्वेची धडक बसून पडवण येथील २२ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी वाघणगाव येथे घडली आहे .
लांजा : तुतारी एक्स्प्रेस रेल्वेची धडक बसून पडवण येथील २२ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी वाघणगाव येथे घडली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, पडवण घडशीवाडी येथील महेश प्रकाश घडशी (२२ वर्षे ) याला दारूचे व्यसन होते. तो नेहमी गावात दारू प्राशन भांडण करत असे. सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी तो नेहमीप्रमाणे दारू प्राशन आला होता. दारूच्या नशेत तो संध्याकाळी ७ वाजता घरातून निघून गेला होता.
मंगळवार, १७ नोव्हेंबर रोजी त्याचा मृतदेह वाघणगाव येथील रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. घरातील मंडळींनी त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. सावंतवाडी ते मुंबई जाणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
याबाबतची खबर महेश घडशी याचे वडील प्रकाश नथुराम घडशी( ४७ वर्षे) यांनी लांजा पोलीस स्थानकात दिली आहे. लांजा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. या प्रकरणी हेडकॉन्स्टेबल शांताराम पंदेरे हे अधिक तपास करीत आहेत.