पेट्रोलिंग करताना गाडीची तपासणी, दापोलीत पकडले २२० किलो गोमांस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 01:37 PM2021-04-26T13:37:26+5:302021-04-26T13:39:29+5:30
Crimenews Dapoli Ratnagiri : दापोली शहरात पेट्रोलिंग करत असताना एका गाडीची तपासणी केली असता त्यात दापोली पोलिसांना गोमांस आढळले. या गाडीतून पोलिसांनी तब्बल २२० किलो गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मंडणगडमधील दोघांना अटक केली असून, त्यांना मदत करणाऱ्या अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
दापोली : शहरात पेट्रोलिंग करत असताना एका गाडीची तपासणी केली असता त्यात दापोली पोलिसांना गोमांस आढळले. या गाडीतून पोलिसांनी तब्बल २२० किलो गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मंडणगडमधील दोघांना अटक केली असून, त्यांना मदत करणाऱ्या अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
याबाबत अधिक वृत्त असे की, दापोली पोलीस रविवारी रात्री पेट्रोलिंग करत असताना त्यांना काळकाई कोंड परिसरात एक मारुती ओमनी गाडी दिसली. ही गाडी मंडणगड तालुक्यातील लाटवण येथून दापोलीत आली होती. पोलिसांनी या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये २२० किलो गोमांस सापडले. पोलिसांनी अल्ताफ पेटकर (४८) व जुबेर खलफे (४०) या मंडणगड येथील दोघा संशयितांना अटक केली आहे. त्यांना मदत करणाऱ्या मुस्तीद खलिपे व अजमल पेटकर यांचा दापोली पोलीस शोध घेत आहेत
पोलिसांनी अटक केलेल्या दोघांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम २०१५ चे कलम ५ (ब), (क) ९ (अ) व मोटर वाहन कायदा कलम ३/ ११८, १३०, १७७, १३३, १९४ व भारतीय दंड विधान कलम ४२९, ३४, २२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ या करत आहेत.