चिपळुणात दोन महिन्यांत २४२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:39 AM2021-06-09T04:39:26+5:302021-06-09T04:39:26+5:30

चिपळूण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तालुक्यात कहर सुरू असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. १ एप्रिल २०२१ ते ...

242 killed in two months in Chiplun | चिपळुणात दोन महिन्यांत २४२ जणांचा मृत्यू

चिपळुणात दोन महिन्यांत २४२ जणांचा मृत्यू

Next

चिपळूण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तालुक्यात कहर सुरू असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. १ एप्रिल २०२१ ते ३० मेपर्यंत तालुक्यातील ६ हजार २३१ लोकांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यापैकी तब्बल २४२ जणांचा बळी गेला आहे, तर ५ हजार ६९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने सद्यस्थितीत ५२० सक्रिय रुग्ण आहेत.

तालुक्यात मार्च महिन्यानंतर कोरोनाचे रुग्ण सापडू लागले. एप्रिल महिन्यापासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. साधे बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर्स बेडची कमतरता असतानाच रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूंचे प्रमाणही वाढल्याने प्रशासन व आरोग्य विभाग हतबल झाला होता. कोरोनाच्या साऱ्या लाटेने एप्रिल व मे महिन्यांत अक्षरश: हाहाकार उडवला होता. येथील आरोग्य विभाग व महसूल विभागातर्फे मिळालेल्या माहितीनुसार १ एप्रिल २०२१ ते ३० मेपर्यंत तालुक्यातील ६ हजार २३१ लोकांना कोरोनाने बाधित केले. त्यापैकी ५ हजार ४६९ जणांनी कोरोनावर मात केली, तर उपचारादरम्यान तब्बल २४२ रुग्णांना आपला दुर्दैवी जीव गमवावा लागला.

२७ मे रोजी १३९ रुग्ण, २८ मे रोजी १२९ रुग्ण, २९ मे रोजी ८० तर ३० मे रोजी ३५ नवे रुग्ण आढळून आले. मात्र, ३१ मे ते ६ जूनपर्यंत कोरोना चाचणीचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. आजही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने आणि बाधित रुग्णसंख्येत घट झाल्याने सध्या ॲक्टिव्ह असणाऱ्या रुग्णांची संख्या ५२० झाली आहे.

------------------------

उपचार घेणारे रुग्ण

सती येथील आयुसिद्धी हॉस्पिटलमध्ये ४, डेरवण रुग्णालयात १६, वहाळ कोविड केअर सेंटरमध्ये ५९, गोवळकोट मदरसा येथे १, होम आयसोलेशनमध्ये २७१, हॉटेल ग्रीन पार्क येथील कोविड सेंटरमध्ये ७, लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये १५, मंदार एज्युकेशन सोसायटीच्या पेढांबे येथील कोविड केअर सेंटरमध्ये ६१, रेफर केलेले २, सावर्डे येथील संजीवनी हॉस्पिटल येथे ४, कामथे उपजिल्हा रुग्णालय येथे ४६, चिपळुणातील श्री हॉस्पिटल येथे १७, पेढांबे श्री साईश्रद्धा कोविड केअर सेंटर येथे २, रामपूर येथील श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे चिपळूण सिद्धिविनायक हॉस्पिटल ६ व लोटे वक्रतुंड हॉस्पिटल येथे ३ रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: 242 killed in two months in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.