सोने विक्रीच्या बहाण्याने चिपळुणातील व्यापाऱ्याला २५ लाखांचा गंडा, मुंबईतील व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 04:52 PM2023-11-13T16:52:35+5:302023-11-13T16:52:59+5:30
चिपळूण : साेने विक्रीच्या बहाण्याने चिपळुणातील एका व्यापाऱ्याला मुंबईतील साेने व्यापाऱ्याने तब्बल २५ लाखांना चुना लावल्याचा प्रकार समाेर आला ...
चिपळूण : साेने विक्रीच्या बहाण्याने चिपळुणातील एका व्यापाऱ्याला मुंबईतील साेने व्यापाऱ्याने तब्बल २५ लाखांना चुना लावल्याचा प्रकार समाेर आला आहे. या फसवणुकीप्रकरणी चिपळूण पाेलिसस्थानकात मेघनाथ हाडा (रा. लीला गाेल्ड, चाैका बिल्डिंग, भाजी गल्ली, मुंबई) याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फसवणुकीबाबत कृष्णेंदू मुकुल माेंडल (२८, रा. परांजपे माेतीवाले हायस्कूलजवळ, चिपळूण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार हा प्रकार ६ जून २०२२ ते १३ जुलै २०२२ या कालावधीत घडला. कृष्णेंदू माेंडल हे मूळचे माैजे काेलाघाट, पूर्व मेदनीपूर, काेलकाता (पश्चिम बंगाल) येथील रहिवासी आहेत. त्यांचा चिपळूण येथे साेन्याचा व्यवसाय आहे. मेघनाथ हाडा हे साेन्याचे व्यापारी असून, त्यांचे आणि कृष्णेंदू यांचे व्यावसायिक संबंध आहेत.
या व्यावसायिक संबंधातून कृष्णेंदू यांनी मेघनाथ हाडा यांच्याकडे ५०० ग्रॅम साेने खरेदीसाठी राेखीने, तसेच आरटीजीएस व एनईएफटीद्वारे २५ लाख रुपये दिले हाेते. त्यानंतर साेने खरेदीबाबत मेघनाथ हाडा टाळाटाळ करू लागले. त्यानंतर कृष्णेंदू यांनी दिलेल्या रकमेची मागणी केली. मात्र, ही रक्कमही देण्यास टाळाटाळ केली. कृष्णेंदू यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी चिपळूण पाेलिसस्थानकात एक वर्षानंतर ११ नाेव्हेंबर २०२३ राेजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.