रत्नागिरीत १५ मेपासून अनेक भागांत २५ टक्के पाणी कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:33 AM2021-05-08T04:33:20+5:302021-05-08T04:33:20+5:30

रत्नागिरी : तालुक्यातील विविध भागांत पाणीपुरवठा करणाऱ्या काजळी नदीतील पाणीसाठा कमी झाल्याने पुरेशा दाबाने नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य हाेत ...

25% water cut in many parts of Ratnagiri from May 15 | रत्नागिरीत १५ मेपासून अनेक भागांत २५ टक्के पाणी कपात

रत्नागिरीत १५ मेपासून अनेक भागांत २५ टक्के पाणी कपात

Next

रत्नागिरी : तालुक्यातील विविध भागांत पाणीपुरवठा करणाऱ्या काजळी नदीतील पाणीसाठा कमी झाल्याने पुरेशा दाबाने नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य हाेत आहे़ त्यामुळे महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाने १५ मे २०२१ पासून २५ टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे रत्नागिरी, मिरजोळे, झाडगांव औद्योगिक क्षेत्र तसेच रत्नागिरी नगर परिषदेचा काही भाग व नजीकच्या ग्रामपंचायती, मिरजोळे, शिरगाव, मिऱ्या, नाचणे, कुवारबांव, पोमेंडी, कर्ला, चिंद्रवली, टिके व इतर काही खासगी ग्राहकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. सद्य:स्थितीमध्ये काजळी नदीतील पाणीसाठा अतिशय कमी झाला आहे़ त्यामुळे पुरेशा दाबाने नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य होत आहे. सध्या पावसाचे आगमन अनिश्चित असल्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे नियोजन करून पाऊस चालू होईपर्यंत पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने महामंडळाने पाणीपुरवठा कालावधीमध्ये कपात करण्याचे धोरण ठरविले आहे.

सध्याचा अल्प पाणीसाठा लक्षात घेऊन व पाऊस लांबणीवर जाण्याची शक्यता ओळखून महामंडळाकडून १५ मे २०२१ पासून २५ टक्के पाणीपुरवठा कपात करण्याचे ठरविले आहे. तसेच सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा. तसेच पाऊस लांबणीवर पडल्यास आणखी कपात करावी लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी महामंडळास सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

Web Title: 25% water cut in many parts of Ratnagiri from May 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.