जिल्ह्यात २५९ रुग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:33 AM2021-09-19T04:33:25+5:302021-09-19T04:33:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, एकाच दिवसात तब्बल २५९ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, एकाच दिवसात तब्बल २५९ कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात ७१ रुग्ण सापडले आहेत, तर कोरोनाने चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात १,०२४ रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात एका दिवसात रुग्ण बरे झाले आहेत. यापूर्वी रुग्ण बरे हाेण्याची संख्या शंभरच्या आतच होती. जिल्ह्यात मागील २४ तासांत बरे झालेल्या रुग्णांमध्ये मंडणगड तालुक्यातील १५, दापोलीतील ४०, खेडमधील १९, गुहागर व चिपळुणातील प्रत्येकी ४०, संगमेश्वरातील २३, रत्नागिरीतील ६५, लांजातील ५ आणि राजापुरातील १२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ७३,०९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५९ टक्के आहे.
जिल्ह्यात दिवसभरात सापडलेल्या बाधित रुग्णांमध्ये मंडणगड, दापोली तालुक्यातील प्रत्येकी ५ रुग्ण, खेडमध्ये ४, गुहागरातील ३, चिपळुणातील १८, संगमेश्वरातील ६, रत्नागिरीतील २२, लांजातील २ आणि राजापुरातील ६ रुग्णांचा समावेश आहे. बाधितांची एकूण संख्या ७७,३१७ झाली आहे. राजापुरातील २ आणि चिपळूण, संगमेश्वरातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत २,३८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण ३.९ टक्के आहे.