लॉकडाऊनमध्ये चिपळूण आगारातून २६ बसफेऱ्या धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:24 AM2021-06-04T04:24:17+5:302021-06-04T04:24:17+5:30
चिपळूण : झपाट्याने वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३ जून ते ९ जूनपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला ...
चिपळूण : झपाट्याने वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३ जून ते ९ जूनपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. या धर्तीवर चिपळूण आगारातर्फे मुंबई, पुणे मार्गासह परजिल्ह्यातील एसटी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी खेड, गुहागर व रत्नागिरीसह औद्योगिक वसाहतींकडे जाणाऱ्या मार्गावर २६ बसफेऱ्या आठवडाभर सुरू ठेवण्यात येणार आहेत.
तालुक्यात गुरुवारपासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या कालावधीत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याबाहेर जाणे किंवा परजिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणे यावर बंदी घातली आहे. त्यामुळे चिपळूण आगारातर्फे मुंबई, पुणे मार्गासह परजिल्ह्यात धावणाऱ्या सर्व एसटीच्या फेऱ्या आठवडाभर बंद ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच जिल्ह्यात २६ बस फेऱ्या सुरू राहणार आहेत. यामध्ये चिपळूण-शेल्डी (एमआयडीसी) पहाटे ५ वाजता, दुपारी १२.४५ वाजता, रात्री ९ वाजता, चिपळूण-नोसिल सकाळी ६ वाजता, दुपारी २ वाजता, रात्री १० वाजता, चिपळूण-खेड (एमआयडीसी) सकाळी ६ वाजता, दुपारी २ वाजता, सायंकाळी ६ वाजता, चिपळूण - जे.के. फाइल्स गाणे सकाळी ६.३० वाजता, दुपारी २.१५ वाजता, चिपळूण-पोफळी सकाळी ६.३० वाजता, सकाळी ८.३० वाजता, सायंकाळी ५ वाजता, सायंकाळी ७ वाजता, रात्री ८.३० वाजता, चिपळूण-रत्नागिरी सकाळी ७.४५ वाजता, दुपारी १.३० वाजता, चिपळूण-गुणदेफाटा सायंकाळी ४.१० वाजता, चिपळूण-डेरवण सकाळी ८.३० वाजता, सायंकाळी ५ वाजता, चिपळूण-गुहागर सकाळी ८ वाजता, सकाळी ८.३० वाजता, सकाळी १० वाजता, सायंकाळी ६ वाजता, रात्री ८ वाजता आदी फेऱ्यांचा समावेश आहे. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांनी केले आहे.