विभागीय साहित्य संमेलनात २९२ शाळा

By Admin | Published: November 20, 2014 10:52 PM2014-11-20T22:52:16+5:302014-11-21T00:38:55+5:30

संमेलनाची तयारी : दापोलीत हजारो विद्यार्थी घेणार साहित्यिक भेटीचा आनंद

292 schools in the Regional Literature Convention | विभागीय साहित्य संमेलनात २९२ शाळा

विभागीय साहित्य संमेलनात २९२ शाळा

googlenewsNext

दापोली : येथे होणाऱ्या २४व्या विभागीय साहित्य संमेलनात तालुक्यातील सर्व शाळांतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या संमेलनासाठी पंचायत समिती, दापोलीचा शिक्षण विभाग, कृषी विभाग, ग्रामपंचायती, अभियंता आपले योगदान देणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या दापोली शाखेच्या वतीने १९ आणि २० डिसेंबर या कालावधीत संमेलनाचे दापोली येथे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये २९२ शाळा सहभागी होणार आहेत.
पंचायत समितीच्या दापोली येथे आयोजित समन्वय बैैठकीत विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी या संमेलनाचे आयोजन केले आहे. हे संमेलन आमच्यासाठी अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट असून, यासाठी आमचे संपूर्ण सहकार्य असेल, अशी ग्वाही दिली.
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद, दापोली शाखेचे अध्यक्ष कैलास गांधी, कार्याध्यक्ष संतोष शिर्के यांनी संमेलन आयोजनामागची भूमिका मांडली.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती गीतांजली वेदपाठक, सदस्य मुजीब रूमाणे, दीप्ती निखार्गे, गटविकास अधिकारी डॉ. मनीषा देवगुणे, गटशिक्षणाधिकारी शिंदे, नगराध्यक्ष जावेद मणियार यांनी विचार मांडले. यावेळी संमेलन कार्यवाह मंगेश मोरे, प्रशांत कांबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी उमेश भागवत, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना, दापोली अध्यक्ष जलील ऐनरकर, सचिव चौगुले, कास्ट्राइब, दापोलीचे अध्यक्ष चंद्रमणी महाडिक, महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघाचे दापोली अध्यक्ष जीवन सुर्वे, सचिव अविनाश मोरे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक केंद्र प्रमुख संघ, दापोलीचे अध्यक्ष विनायक वाळंज, सचिव विजय क्षीरसागर, अखिल शिक्षक संघ, दापोलीचे अध्यक्ष प्रवीण काटकर, सचिव अजय उपरे, कृषी अधिकारी आर. टी. घावर, शासकीय अभियंता संघटनेचे ए. एच. शेंडे, एम. आर. परदेशी, ग्रामसेवक संघटना सचिव एस. आर. सकपाळ, कोषाध्यक्ष डी. जी. साठे, ग्रामसेवक समीर कदम, एस. एम. महाडिक, अ. अ. नेरसेकर, एम. डी. परकार आदी उपस्थित होते. दापोली येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात विविध कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. यानिमित्ताने साहित्यिकांच्या उपस्थितीत शाळकरी मुलानाही चांगला अनुभव व साहित्य विश्व अनुभवता येणार आहे. संमेलनाची तयारी सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 292 schools in the Regional Literature Convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.