Ratnagiri: केस मिटवून देण्यासाठी ३ हजाराची लाच, खेडच्या महसूल सहायकाला अटक
By शोभना कांबळे | Published: January 11, 2024 03:32 PM2024-01-11T15:32:42+5:302024-01-11T15:33:13+5:30
रत्नागिरी : तक्रारदार व त्यांचे सहकारी यांच्या विरुद्ध खेड तहसीलदार कार्यालयात सुरू असलेली चाप्टर केस मिटवून देतो, असे सांगून ...
रत्नागिरी : तक्रारदार व त्यांचे सहकारी यांच्या विरुद्ध खेड तहसीलदार कार्यालयात सुरू असलेली चाप्टर केस मिटवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून ३ हजार रूपयांची लाच घेणाऱ्या महसूल सहायक चंपकलाल महाजन डेढवाल (५२ वर्षे, तहसील कार्यालय, खेड) याला गुरूवार, दि. ११ रोजी रत्नागिरीच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून त्याच्याकडून ही रक्कम हस्तगत केली आहे.
आरोपी चंपकलाल डेढवाल याने २८ डिसेंबर रोजी ३००० रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती देताच या विभागाने सापळा रचला. गुरूवारी ३००० रूपये पंचासमक्ष स्वीकारताना आरोपी डेढवाल याला रंगेहात पकडून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक शहानवाज मुल्ला, हवालदार संतोष कोळेकर, विशाल नलावडे, नाईक दिपक आंबेकर, काॅन्स्टेबल हेमंत पवार यांनी ही कारवाई केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक शहानवाज मुल्ला करीत आहेत.