रत्नागिरी जिल्ह्यातील ३११ गावे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 06:21 PM2024-08-23T18:21:47+5:302024-08-23T18:22:16+5:30

नागरिकांनी ६० दिवसांच्या आत हरकती नोंदविण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना

311 villages of Ratnagiri district declared environmentally sensitive | रत्नागिरी जिल्ह्यातील ३११ गावे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर

रत्नागिरी जिल्ह्यातील ३११ गावे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि संगमेश्वर या पाच तालुक्यांमधील ३११ गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत कुणाच्या हरकती असल्यास ६० दिवसांत हरकती सादर कराव्यात, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.

केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल यांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्धीसाठी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि संगमेश्वर या पाच तालुक्यांतील ३११ गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित केली आहे. या मसुदा अधिसूचनेत नमूद केल्यानुसार क्षेत्रातील ज्या स्थानिक रहिवासी यांची यासाठी हरकत आहे, त्यांनी साठ दिवसांच्या आत केंद्र शासनाच्या पर्यावरण वने व वातावरण बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली- ११०००३ यांच्याकडे हरकत नोंदविणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूरचे सदस्य सचिव तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडील केंद्र शासनाचे पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाचे अधिसूचना पत्रासह प्राप्त झाले आहे. त्यानुसार चिपळूण, खेड, राजापूर, रत्नागिरी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार चिपळूण, खेड, लांजा, राजापूर व संगमेश्वर यांना ही अधिसूचना स्थानिक पातळीवर प्रसिद्ध करून अधिसूचनेबाबत हरकतीचा अहवाल सादर करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

कोणत्या तालुक्यात किती गावे?

तालुका - संख्या
चिपळूण - ४४
खेड - ८५,
लांजा - ५०
राजापूर - ५१
संगमेश्वर - ८१
एकूण - ३११

Web Title: 311 villages of Ratnagiri district declared environmentally sensitive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.