Nagar Panchayat Election : राजकीय वादात लक्षवेधी ठरलेल्या दापोलीत पहिल्या टप्यात ३१ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 13:28 IST2021-12-21T13:27:58+5:302021-12-21T13:28:49+5:30
दापोली नगरपंचायत तेरा प्रभागाची होत असलेली निवडणूक शिवसेनेच्या दोन नेत्यांमुळे अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. शिवसेना नेते विद्यमान आमदार योगेश कदम समर्थकांनी शिवसेवा अपक्ष आघाडी केली आहे.

Nagar Panchayat Election : राजकीय वादात लक्षवेधी ठरलेल्या दापोलीत पहिल्या टप्यात ३१ टक्के मतदान
दापोली : शिवसेनेतील दोन दिग्गज नेत्याच्या वादामुळे दापोली, मंडणगड नगरपंचायत निवडणूक चांगलीच चुरशीची बनली आहे. अतिशय विखारी आणि हाय होल्टेज प्रचारामुळे दापोली नगरपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळच्या सत्रात ३१ टक्के इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत नेमके कोण बाजी मारणार हेच पाहावे लागणार आहे. प्रचाराचा धुरळा उडाल्यामुळे मतदान कसे होईल याकडे सर्वांचे लक्ष होते परंतु आज सकाळपासूनच दापोली, मंडणगड दोन्ही नगरपंचायत निवडणुकीत मतदान मात्र शांततेत सुरू आहे. दोन्ही तालुक्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार आढळून आला नाही. परंतु वातावरण मात्र तणावपूर्ण असल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
दापोली नगरपंचायत तेरा प्रभागाची होत असलेली निवडणूक शिवसेनेच्या दोन नेत्यांमुळे अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. शिवसेना नेते विद्यमान आमदार योगेश कदम समर्थकांनी शिवसेवा अपक्ष आघाडी केली आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची बनली आहे. तर, काँग्रेस, मनसे, भाजपा स्वतंत्र निवडणूक लढत आहेत.